1st Birthday invitation Marathi Message

आमचे चिरंजीव..
यांचा प्रथम जन्मदिवस..
दिनांक. रोजी सायंकाळी 6 वा.
स्थळ-
येथे करण्याचे योजिले आहे..
तरी आपण सर्वांनी,
आमच्या आनंदात सहभागी होऊन,
आमच्या चिंरजीवास शुभार्शीवाद द्यावे ही विनंती..


वाढदिवसाचे आमंत्रण

🔷आग्रहाचे निमंत्रण 📢🔷

आमची लाडकी मुलगी अंँजेलीना
हिचा पहिला वाढदिवस🎂🎉🎁
बुधवार, दि. २८ एप्रिल २०२१ रोजी
सायं ७ वाजता करण्याचे योजिले आहे.
तरी आपण सहपरिवार 👨‍👩‍👧‍👧 उपस्थित राहावे,
हि नम्र विनंती!🙏😊
❉ स्थळ ❉
ताज बंगला, मुंबई
❉ निमंत्रक ❉
राजेश भोसले सह परिवार..


|| श्री गजानन प्रसन्न ||
लाडक्या लेकीचा प्रथम वाढदिवस
लेक म्हणजे तांबडं कुंदन, लेक म्हणजे हिरवं गोंदण..
लेक म्हणजे झाडाची पालवी, लेक म्हणजे सुगंधी चंदन,
अशाच आमच्या लाडक्या लेकीचा पहिला वाढदिवस साजरा करायचा आहे.
केक, फुगे, वेफर्स, भेटवस्तू सर्व काही असलं तरी
तुमच्या आशिर्वाद आणि शुभेच्छांशिवाय
आमच्या लेकीच्या वाढदिवशी काहीच मौल्यवान नाही…
तेव्हा प्रियाच्या पहिल्या वाढदिवसाला सर्वांनी यायचं हं..
शुक्रवार ३ फेब्रुवारी २०२३
केक कटिंग – सायं 6:30
जेवणाची वेळ – सायं 7:30 – 9:30
❉ पत्ता ❉
तुलसी बंगलो, मुंबई
✽ निमंत्रक ✽
राकेश मोरे सह परिवार
(PH : 991-10-654321)


चि. राजेश
प्रथम वाढदिवस सोहळा निमंत्रण
मला या जगात येऊन एक वर्ष पूर्ण होतंय ……
माझ्या आई वडिलांना हा क्षण साठवून ठेवायचा आहे
त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी व तुम्हा सर्वांचे
शुभाशीर्वाद मिळावे यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्या
वाढदिवसाला यायचं हां….!

शनिवार दि. २०/१२/२०२२ रोजी सायं ७ वाजता


 

आमच्या येथे खंडोबा कृपेने आमचा पुत्र,
कुमार देव याचा पहिला वाढदिवस समारंभ
गुरुवार दिनांक २७/१२/२०१८ रोजी सायंकाळी ७:३०
वाजता करण्याचे योजिले आहे,
तरी आपण सहपरिवार उपस्थित राहून,
बालकास शुभ आशीर्वाद द्यावेत,
हि नम्र विनंती!
निमंत्रक: गणेश शिंदे आणि उज्वला शिंदे
पत्ता: प्रियंका हॉल, मुंबई.


निमंत्रण

सार्थक याच्या पहिल्या वाढदिवसा निमित्त
आपल्याला व आपल्या मित्र परिवाराला
आमच्या कडुन आग्रहाचे निमंत्रण आहे,
तरी पुर्ण परिवारा सोबत वाढदिवसाला यावे..
हि नम्र विनंती..

दि = 19 ऑगष्ट 2022
वार= शुक्रवार
स्थळ = हनुमान मंदिर सभागृह,
राम नगर सिडको औरंगाबाद,


❉ वाढदिवसाचे आमंत्रण ❉
वार- दिनांक – वेळ –
पहिले पाऊल पहिला गंध, लाडात तिच्या सारे गुंग,
पहिले तीचे शब्द ऐकून, आम्ही दोघे झालो स्तब्ध,
हळूच पडले पहिले पाऊल, लागली तिच्या वाढीची चाहूल..
पहिल्या वाढदिवसाचा न्यारा आनंद, पाहताना तुम्ही देखील व्हाल दंग..
स्थळ –
निमंत्रक –


क्षण हा भाग्याचा,
लाडक्या लेकीला मोठं होतांना पाहण्याचा,
आमची कन्या… आता एक वर्षांची होणार
तेव्हा या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी,
तिच्या आजी-आजोबा, काका-काकू,
मामा-मामी, ताई-दादाचे आर्शीवाद तर हवेच…
तेव्हा आपण सर्वांनी भेटू या….
दिनांक…. वेळ…. स्थळ…
आणि हा क्षण साजरा करू या..


केक, फुगे, वेफर्स, भेटवस्तू
सर्व काही असलं तरी
तुमच्या आर्शीवाद आणि शुभेच्छांशिवाय
माझ्या लेकीच्या वाढदिवशी
काहीच मौल्यवान नाही…
तेव्हा ….च्या पहिल्या वाढदिवसाला सर्वांनी यायचं हं..
दिनांक –
वेळ –
स्थळ –


आमचे विश्व तो, आमचे सूख तो,
आमच्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण तो,
तोच आमच्या जगण्याची आशा,
तोच आहे श्वास.
त्याचा पहिला वाढदिवस करायचा आहे खास..
दिनांक –
वेळ –
स्थळ –


तो क्षणही क्षणभर सण असतो,
जो सर्वांसोबत मिळून साजरा केला जातो..
माझ्या मुलांच्या पहिल्या वाढदिवसाचा क्षण,
असाच सण करायचा आहे.
त्यासाठी आपल्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण..


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.