Aaicha Vadhdivas | Birthday Wishes for Mother

आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस..
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!


आई माझ्या प्रत्येक गुणांवर लक्ष ठेवून
तू त्यांचा विकास केलास..
आणि माझा प्रत्येक दोष
अगदी काळजीपूर्वक हेरून
तो दूरही केलास..
म्हणून तर आज माझं व्यक्तिमत्त्व
इतकं समृद्ध झालंय..!
आई तुझे खूप आभार..
आणि तुला वाढदिवसासाठी
कृतज्ञतापूर्वक शुभेच्छा..!

Leave a Comment