100+ आई-बाबा स्टेटस मराठी | Aai baba status in marathi.

13 Min Read

Mother-Father Status In Marathi / आई-बाबा स्टेटस मराठी

Aai baba status in marathi :- स्वतःच्या पालकांसाठी नेहमी आभारी राहा, मग ते कसेही असले तरी. पुरुष आणि स्त्रिया आहेत ज्यांनी जन्म देणारी जीवनाची एक अमूल्य देणगी दिली आहे कदाचित इतकेच नाही तर तुमचे बहुतेक प्रेम, काळजी, वेळ आणि मेहनत आणि त्यांनी वैयक्तिकरित्या तुमच्यासाठी केलेल्या त्यागासाठी देखील. वृद्धापकाळात जेव्हा त्याच्या/तिच्या पालकांना मदतीची गरज असते तेव्हा सर्वोत्कृष्ट कार्य करणे हे प्रत्येक व्यक्तीचे काम आहे. भारतीय संस्कृतीनुसार आई-वडील आधी मग देव.
जर तुम्हाला तुमचे प्रेम तुमच्या पालकांप्रती व्यक्त करायचे असेल तर तुम्हाला खालील कोट्स आवडतील. आम्ही काही सर्वोत्कृष्ट कोट निवडले आहेत जे प्रत्येकजण संबंधित असू शकतात.

आजच्या पोस्टमध्ये Aai-baba status in Marathi, आई-बाबा स्टेटस मराठी, Mother-Father Status In Marathi, Mother-Father Quotes In Marathi, Mother-Father Message In Marathi, Mother-Father Shayari In Marathi, Mother-Father Sms In Marathi इत्यादी collection आम्ही घेऊन आलो आहोत.

Mother-Father Status In Marathi

Aai baba status in marathi

स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
तो एक बाप असतो…..

जिद्द म्हणजे काय हे आई असते
मनातला विश्वास म्हणजे बाबा असतात
आई विना हे जग अधुरे असते
बाबा हे सारे विश्व असतात

वेळेनुसार ऋतु सुद्धा बदलत असतात
जे केव्हाही बदलत नाही
ते आई वडिलांच प्रेम असत

सोसताना वेदना मुखातून
एक शब्द नेहमी येई प्रेमाचा
पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई…

जो पर्यंत आई वडील सोबत आहेत
तो पर्यंत मला प्रेमाची कमी
कधीच भासणार नाही

आई वडिलांपेक्षा
मोठी संपत्ती
कोणतीच नाही

जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर
आपले आईवडील आहेत कारण
त्यांचे इतके प्रेम कोणी देत नाही.

सगळे म्हणतात ‪पहिल‬ प्रेम
‪विसरता‬ येत नाही
मग ‪बरेच‬ जण आपल्या
‪आई वडिलांना‬ का विसरतात..

आई जर आपल्याला उचलून जग
दाखवत असतील तर बाबा
आपल्याला डोक्यावर उचलून हे
जग दाखवतात

Aai-baba status in marathi / आई-बाबा स्टेटस मराठी

आई-बाबा स्टेटस मराठी

संस्कार‬ दुकानावर नाही भेटत ते
आपल्या आईच्या पदरात आहे
नशीब वाल्यालाच भेटते..

या जगात एकच सुंदर व गोंडस
मुल आहे व ते प्रत्येक आई
जवळ असते…!

यशाच्या आकाशात गरूड
होऊन जेव्हा आपण भरारी मारत असू.
पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग
विसरून पहात असतील.
ते दोन डोळे म्हणजे आपले
आई-वडील.

यश मिळाल्यावर तर मोठ-मोठे
लोक मागे लागतात
पण अपयशी असताना
यशाचा मार्ग दखवणारे
फक्त आई वडिलच असतात

मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई
आणि गल्ली गल्लित भाई
पण या जगात सगळ्यात
भारी आपली आई..

या smartphone च्या जगात
लेकरं स्मार्ट झाली
पण आई-बाप मात्र
फोन सारखी कोपऱ्यात पडून राहिलेत

आपल्या संकटांवर निधड्या छातीने
मात करणाऱ्या शक्तीस बाप म्हणतात
आपल्या भवितव्यासाठी कष्टाशी
चार हात करणाऱ्या भक्तीस बाप म्हणतात

सोबत कोण नसेल तर थांबु नका
कारण कोणी सोबत नसेल तरी
आई वडिलांचे आशिर्वाद
कायम सोबत असतात.

दुःख कितीही मोठ का असेना
प्रत्येक दुःख विसरून जातो
जेव्हा आई वडिल समोर असतात

पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही,
आईच्या डोळ्यांत येणा-या
आनंदाश्रूंसाठी मोठ होयचयं..

Mother-Father Quotes In Marathi

Mother-Father Quotes In Marathi

पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला..

वडिलकीचं नातं हे आहे असं अनमोल,
ज्यामध्ये असतो राग आणि प्रेमही,
त्यातच असतो आपलेपणा

पहिल्या नजरेतील प्रेमावर
माझा विश्वास आहे कारण ?
मी जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले
तेव्हा पासुन आईच्या प्रेमात आहे
I LOVE U ‪आई‬..

ज्यांना आपल्या आई वडिलांची
किंमत कळत नाही
त्यांना प्रेमाची किंमत काय कळणार

देवाची पुजा करुन आई मिळवता
येत नाही..
आईची पुजा करुन देव
मिळवता येतो…
देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला…

देव दिसला आई मज तुझ्या
अंतरात,मग सांग मी
का जाऊ मंदिरात ….

आई बाबा तुम्ही सोबत आहात
म्हणुन कशाची चिंता नाही

प्रत्येक वेळेस मी खाली पडल्यावर
मला उचलतो, माझा बाबा माझा
वर खूप प्रेम करतो

आई कोणाची ही जागा घेऊ शकते
पण आई ची जागा
कोणीच नाही घेऊ शकत

संपत्ती च्या मागे धावता धावता
सर्वात मोठी संपत्ती आई वडील आहे
हे विसरु नका

आई-बाबा कोट्स मराठी

Aai baba quotes in marathi

आई वडील कितीही अशिक्षित असुदेत
शाळेपेक्षा जास्त संस्कार हे
आई वडिलांकडुनच मिळतात

रोज कित्येक जण सोबत असतात
पण मोठ्या संकटात फक्त
आई वडिलच साथ देतात

चुक झाली की साथ सोडणारे
खुप जण असतात
पण प्रत्येक चुक माफ करणारे
फक्त आई वडिलच असतात

माझा रुबाब, माझा Attitude,
माझा Smile यांच्या मागचं खरं
कारण म्हणजे माझे बाबा

तुम्ही या जगात सगळ्यांचे
ऋण फेडाल….
पण आई वडिलांचे कधीही
फेडू शकणार नाही ….

तिच्याशीच लग्न करा जी
आईवर जिवापाड प्रेम करते,
कारण जी आईवर प्रेम करते
तीच आयुष्यभर प्रेम करण्या
लायक असते.

डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती,
डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी,
आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त
आई……

ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”…

जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे
असतात अन् खाणारे पाच
असतात तेव्हा एक जण म्हणते
मला भुख नाही ती म्हणजे
” आई”

प्रेत्येक वडील हे त्याचा मुलासाठी
त्याचे सर्वात मोठे Hero असतात
आणि मुलीसाठी तिचे पहिले प्रेम

Mother-Father Message In Marathi

Mother Father status in marathi

जिच्या उदरात जन्म होतो ती
माता आणि जिच्या उदरात
अस्त होतो ती माती यातील
वेलांटीचा फरक म्हणजे माणसाचे जीवन.

जगाला मंदिर मस्जिद चर्चमध्ये
देव दिसतो
मला मात्र माझ्या आईत दिसतो…

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात
ठेवी बाबा.. शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा…

खूप आनंद झाल्यावर किंवा
खूप दुःखी असल्यावर
एका व्यक्तीच्या कुशीत जावसं
वाटत ती म्हणजे ‪आई‬… ‪

खिशातल्या हजार रुपयांची किंमत
सुद्धा लहानपणी आईने
गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या
एक रुपयापेक्षा कमीच असते..

कितीही जीव लावणारी ‪गर्लफ्रेंड‬ मिळु द्या
पण ती फक्त ‪आईच‬ असते
जी फोनवर फक्त ‪आवाज‬ ऐकुनच
सांगुन टाकते,
पोरगा किती ‪आजारी‬ आहे ते…

कधीतरी आपल्या ‪आईच्या‬
डाेळयात बघा,
ताे एक असा ‪आरसा‬ आहे,
ज्यात तुम्ही कधीच ‪म्हातारे‬
दिसणार नाहीत……

बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,
बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,
जो स्वतःसाठी सोळून तुमचासाठी
जगतो ते असत बाबा चे प्रेम

आई-बाबा मेसेज मराठी

आयुष्यात‬ दोनच ‪‎गोष्टी‬ मागा…….
‎आई‬ शिवाय ‪‎घर‬ नको आणि‬
कोणतीही ‪‎आई बेघर‬ नको..

आयुष्यात दोन व्यक्तींची खूप
काळजी घ्या…
तुम्ही जिंकण्यासाठी स्वत:
आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”
तुमच्या हरण्याला सतत जिंकणं
मानत आली ती – ”आई”

खरा आनंद तर तेव्हा होईल
जेव्हा पैसे माझे असतील आणि
खरेदी माझे आईबाबा करतील..

आयुष्यात काही नसले
तर चालेल……
पण आईचा हात मात्र
पाठीशी असावा…

आपल्या दुःखाचे प्रदर्शन करू नका,
दुसऱ्यासाठी जगा. दुसऱ्यासाठी
जगल्यावर आपली दुःखं संपून जातील.
यासाठी आपल्या काळजातील
“आई’ जपून ठेवा..

आपण‬ कितीही ‪मोठे‬ झालो तरी ‪रस्ता‬
cross करताना ‪आपली आई‬
आपला हात कधीच
‪सोङत‬ नाही..

बाप असतो तेलवात, जळत असतो
क्षणाक्षणाला.. हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला…

आईच्या पदरात झोपण्याचा
आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही.
कारण जिन्स घातलेली आई
पदर देऊ शकत नाही.

आईचे‬ उपकार कधीही
नाही फिटणार कारण
तिला फक्त ‪‎देणं‬ कळतं ‪घेणं‬ नाही…

आईची माया ही जगातील
सर्वात अनमोल ठेव…
पूजावं त्या माऊलीला
तीझ्यातच मानावा देव…

Mother-Father Shayari In Marathi

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची
धडपड करतो, डोनेशन साठी
उधार आणतो, वेळ पडली तर
हातापाया पडतो, तो बाप असतो…

आई बाबा वरती
माया अपार असायला पाहिजे
सागरासारखं प्रेम अभ्याग असायला पाहिजे
श्रावण बाळाने केली जशी सेवा
तशी आपण पण करायला पाहिजे

आई कितीही मोठा झालो तरी,
तुझ्यासमोर लहानच आहे अजून…
आजही शांत झोप लागते मला,
आई तुझ्याच मांडीवर डोकं ठेवून…

आई … दोन शब्दात सार आकाश
सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई….

आपले दु:ख मनात लपवून दुसऱ्यांना
सुखी ठेवणारा एकमेव देवमाणूस
म्हणजे वडील.

“आई आमची सर्व प्रथम गुरु”
“त्या नंतर आमचे अस्तित्व सुरू”…

!! आईच्या !! गळ्याभॊवती तिच्या
पिल्लानॆ मारलेली मिठी हा
तिच्यासाठी नॆकलॆसपॆक्शाही मॊठा
दागिणा आहॆ

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही
रडता तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही
एखादी चूक करता तुमच्या यशाचा
आनंद साजरा करते
जेव्हा तुम्ही जिंकता आणि तुमच्यावर
विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता

तुम्हीही कितीही मोठे झालात तरी
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि
तो म्हणजे तुमचा बाबा

आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे
आपल्यामुळे आई-वडीलांच्या चेहऱ्यावर
असणारा आनंद आणि समाधान.

आई-बाबा शायरी मराठी

आईचा आशीर्वाद आणि बाबांच्या
शिव्या या मध्ये जगण्यात काही
वेगळीच मज्जा आहे…

आई आणि बाबा ही जगातील इतकी
मोठी हस्ती आहे ज्यांच्या घामाच्या
एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताच
मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही…

आईने केलेल्या जेवणाला कधीच
नाव ठेऊ नका कारण.. काही
लोकांजवळ आई नाही तर काही,
लोकांजवळ जेवण नाही…

कोणी रोझा ठेवला.. तर,
कोणी नवराञीचे उपवास ठेवले..
तर, कोणी श्रावण ठेवले.. परंतु,
सुखी तोच झाला ज्याने,
घरात आई बाप ठेवले…

आई ची वेडी माया पडतो मी तुझ्या
पाया कायम तुझ्या पोटी जन्मो हीच
माझी जन्मोजन्मी ची आशा…

तुम्ही या जगात, सगळ्यांचे ऋण फेडाल..
पण, आई वडिलांचे ऋण
कधीही फेडू शकणार नाही…

बाहेर किती पण काही खाले तेरी
भूक तर आई चा हातानी बनवलेल्या
जेवणनीच जाते बर का

आई दिव्याची ज्योत असते,
आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा
म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा
आपला बाबा असतो…

का कुणावर प्रेम करायचं,
का कुणासाठी झुरायचं,
का कुणासाठी मरायचं,
देवाने आई वडील दिले आहेत,
त्यांच्यासाठीच सगळं करायचं…

एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या
आधीपासून माझ्यावर प्रेम करते…
आई! एकमेव माणूस जो माझ्यावर
स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो… बाबा!

Mother-Father Sms In Marathi

एक Salute आईसाठी जी बिना
एक पण सुट्टी…. Lifetime आपल्यासाठी …
किती पण बिमार असली तरी काम करते

असेल जर मजला यापुढे मानव
जन्म कधी तर आई फक्त तुझ्याच
पोटी मला पुन्हा जन्मावेसे वाटते…

आई वडीलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा,
परंतु कोणत्याही गोष्टीसाठी,
आई वडीलांना कधीच सोडू नका…

आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे
असेच कायम राहूदे…!!!
आणि असेच माझ्या ह्या जीवनाला
अर्थ येऊ दे…

किंमत नेहमी त्यांचीच करा जे
तुमच्या आई बाबांची इज्जत करतात…

मरणयातना सहन करून सुद्धा
आपली जीवनयात्रा सुरु करून
जी देते ती आपली आई असते

आई च्या आठवणींपासून दूर जाण
कधीच जमणार नाही…
आणि तिने दिलेले हे हृदय रुपी
फुल सुकले तरी त्याचा सुगंध
कधीच सुकणार नाही…

आई मला तुझ्या कुशीत पुन्हा
यावेसे वाटते, या जगापासून मला
आता खूप दूर जावेसे वाटते…

जगातील सर्वात सुंदर गोष्ट आणि
ती म्हणजे आपल्या आई बाबांच्या
चेहऱ्यावर एक सुखद हास्य आणि
त्याच कारण आपण स्वतः असणं…

जो स्वतःच्या आईबाबांचं मन
जिंकेल तो हि दुनिया जिंकेल…

आई-बाबा संदेश मराठी

जिथे माझ्या आईबाबांना इज्जत
नाही तिथे मी वाकून सुद्धा बघत नाही…

आयुष्यात आपण कितीही शिकलो
तरी पैसा आणि नाव कितीही कमवल
तरीही आई आणि बाबा यांच्या
आशिर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असत…

जो आधी रडवतो ना पण नंतर
तेवढंच प्रेमाने समजून सांगतो तो
आपला बाबा असतो…
आणि जी रडवून स्वतः सुद्धा रडते
ना ती आपली आई असते.

पैशाने या जगात सर्व काही मिळेल
पण आईसारखी माया आणि
बाबानं सारखी सावली जगात
कुठेच नाही मिळणार…

नमस्कार न करता ही आपल्याला
आशीर्वाद देणारी जगातील एकमेव
व्यक्ती म्हणजे आपली आई…

माझ्या साठी तीच खास जिने
मला भरवला पहिला घास आणि
ती म्हणजे माझी आई

खूप अडचणी आहेत आयुष्यात
पण सामोरे जाण्याची शक्ती फक्त
आई तुझ्यामुळे येते..

आई ही अशी बँक आहे जिथे
आपण आपली प्रत्येक भावना
आणि दुःख जमा करू शकतो.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide आई-बाबा स्टेटस मराठी, Mother-Father Status In Marathi, Mother-Father Quotes In Marathi, Mother-Father Message In Marathi, Mother-Father Shayari In Marathi, Mother-Father Sms In Marathi, etc. So, just enjoy it, and don’t forget to share and bookmark our collection…

Share This Article