Aatmahatya Kavita – Do Not Suicide Poem in Marathi

2 Min Read

This Poem is Against Suicide & will help you to change your mind from bad Suicide thoughts.
हि कविता तुम्हाला आत्महत्येच्या नकारात्मक विचारातून बाहेर पडायला मदत करेल. तुम्हाला प्रेरणा देईल कि सुसाईड करणे हा किती चुकीचा मार्ग आहे.

आत्महत्या केल्यानंतर खाली येऊन पाहिले मी
माझ्या घरचं एक दृश्य..

खूळ लागलं बापाला, स्वतः कानफटात मारून घेतोय
फोटोकडं बघून माझ्या, स्वतःलाच फार शिव्या देतोय..
केसं सोडून फिरते आई, वेडी झाली म्हणते गांव
ती कोण विचारलं की, माझंच सांगते म्हणे नाव..

बायकोकडे माझ्या बघवत नाही,
उदास आणि निस्तेज झाला चेहरा तीचा.
खळखळून हसणारा चेहरा तिचा पार गायब झाला होता..

तस कारण मोठं न्हवतं माझ्या त्या मरण्याचं,
मलाच न्हवतं भान तेंव्हा, असं काही करण्याचं..
रेल्वे खाली झोपलो, तुकडे झाले क्षणाला
घरचे म्हणतात गोळा करून आणलं तरी कुणाला..

पाहून हे सारं आज पुन्हा मी मरत आहे..

चिमुकली पिल्लं माझी हल्ली फार झुरत आहे,
ईकडून तिकडे घरभर पळतांना दिसत नाहीत..
आत्मा नुसता भरकटतोय परत येता ही येत नाही
त्या बापाची माफी घ्यायला, पुन्हा संधी ही देव देत नाही..

मी एकदाच मेलो पण घरचे रोज मरत आहेत,
माझ्या फोटो समोर बसून विनवण्या करत आहेत..
चुकला माझा निर्णय देवा माफी एकदा देशील का,
पुन्हा एकदा शरीर देऊन, माझ्या घरी मला नेशील का?

बापाला बिलगून रडावं म्हणतो आईच्या पायात पडावं म्हणतो,
आयुष्याला न घाबरता देवा पुन्हा एकदा लढावं म्हणतो..
देवा पुन्हा एकदा घडावं म्हणतो…!

आत्महत्येचा विचार करणार्यांने जरूर वाचावी अशी कविता….

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *