सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली
आईच वाटतेस..
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!
