Bail Pola Status Wishes Marathi | बैल पोळा शुभेच्छा

4 Min Read

Bail Pola Quotes Marathi |  बैल पोळा स्टेटस शुभेच्छा मराठी

आज बैलांचा सण बैलपोळा. वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचा मित्र आज नांगराला जुंपला जात नाही. आज विश्रांती घेण्याचा त्याच्या हक्काचा दिवस. श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येला हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. आज शेतकरी त्याची नदीवर किव्हा ओढ्यावर नेवून आंघोळ घालतो, मग त्याला चरायला नेले जाते. मग घरी आणून प्रत्येक बळीराजा आपल्या ऐपतीप्रमाणे त्याची साजशृंगार सजावट करून त्याला पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य देऊन त्याचे पूजन करतो.
ढोल ताशा सनई वाजवून त्यांची मिरवणूक काढली जाते.

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एकमेव सण शेतकरी बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तुम्ही जर बैल पोळा स्टेटस शोधात असाल तर आम्ही खाली संग्रहित केलेल्या बैल पोळ्याच्या शुभेच्छा ( Bail Pola Wishes Marathi ) तुम्हाला नक्कीच आवडतील. शेतकरी शेतात राबतो आपल्यासाठी अन्न पिकवतो म्हणून आपल्या दोन वेळेच्या जेवणाची सोय होते. तुमच्या शेतकरी मित्राला पोळ्याच्या शुभेच्छा देऊन त्याचे आभार मानायला आज विसरू नका.


Bail Pola Shubhechha Status

शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे..
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे..
बैलपोळ्याच्या शुभेच्छा..!


Bail Pola Family Wishes

बैल पोळा सणानिमित्त
आपणास व आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!


Bail Pola Hardik Shubhechha

आज बैलाले खुराक,
रांधा पुरणाच्या पोया..
खाऊद्या रे पोटभरी,
होऊ द्या रे मंगदुल..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!


Polyachya Hardik Shubhechha


Bail Pola Background


Bail Pola Background Banner


Bail Pola Shubhechha Banner

वाडा शिवार सारं । वाडवडीलांची पुण्याई ।।
किती वर्णू तुझे गुण । मन मोहरून जाई ।।
तुझ्या अपार कष्टानं । बहरते सारी भुई ।।
एका दिवसाच्या पुजेनं । होऊ कसा उतराई ।।
सर्व शेतकरी बांधवानां पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ।।


Bail Pola Shubhechha Banner 1

आज आला सण,
बैल पोळ्याचा..
बैल राजाच्या
कौतुक सोहळ्याचा..!!


Bail Pola Shubhechha Banner 2


Bail Pola


Bail Pola Hardik Shubhechha Image


Bail Pola Wishes Marathi


नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही..
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!


Bail Pola Festival in Marathi Status

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली..
तोडे चढविले कासरा ओढला,
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा..
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!


कष्टाशिवाय मातीला आणि
बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही,
हजारो वर्षांपासून आपल्यासाठी
राबणाऱ्या बैलाचा सण पोळा..
पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवाना
हार्दीक हार्दीक शुभेच्छा!


Bail Pola Quotes Marathi

आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देनं..
बैला, खरा तुझा सन,
शेतकऱ्या तुझं रीन..
बैल पोळा सणाच्या शुभेच्छा..!


Bail Pola Status in Marathi

बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन..
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण..
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!


Bail Pola Caption in Marathi
कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळा,
सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!!


बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!


बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

आला रे आला बैल पोळा,
गाव झालं सारं गोळा..
सर्जा राजाला घेऊनि,
सारे जाऊया राऊळा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *