Funny Marathi Ukhane for Female
चांदीच्या ताटात मुठभर गहू..
लग्नच नाही झालं तर नाव कसं घेऊ..
श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
*** ना आवडतो गरम गरम बटाटेवडा..
एक होती चिऊ एक होती काऊ..
*** रावांचं नाव घेते, डोक नका खाऊ..
बदामाचा केला हलवा त्यात काजू टाकले किसुन..
*** राव बिड्या पितात संडासात बसून..
रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
*** राव एवढे हॅण्डसम पण डोक्यावर टक्कल..
Marathi Ukhane for Bride
संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
*** रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला..
लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,
*** रावां सारखे पती मिळाले, भाग्य माझे किती..
अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रुपाचा,
*** रावाना घास भरवते वरण-भात-तुपाचा..
पूजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा,
*** रावांच्या नावाने मी, भरला सौभाग्याचा चुडा..
सावित्रीने नवस केला, पती मिळावा सत्यवान,
*** रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान..
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
*** रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने..
डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
*** रावांच्या नावाने कुंकु लावते लाल..
Marathi Naav Ghene for Wife
मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
*** रावांचे हेच रुप मला फार आवडले..
नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,
*** रावां सोबत आली मी सासरी..
नागपूर माझे माहेर, नाशिक माझे गांव,
*** रावांचे नांव घेते शेवंती माझे नांव..
शंकराच्या पिंडीवर वाहते बेलाचे पान
*** रावांचं नाव घेऊन राखतें तुमचा मान..
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
***रावांच नांव घेते ***दिवशी..
साजूक तुपात नाजूक चमचा,
***रावांचं नाव घेते आशीर्वाद असावा तुमचा..
पांची पांडव, सहावी द्रौपदी,
***रावांसारखे मिळाले पति, तर देवाचे आभार मानू किती..
समुद्रात आली भरती, नदीला आला पूर,
***रावांच्यासाठी आईबाप केले दूर..
विद्येचा नसावा अभिमान, श्रीमंतीचा नसावा गर्व,
*** रावांचं नाव घेते ऐकत आहेत सर्व..
शंकराचा सोमवार, गणपतीची चतुर्थी,
माझ्या ह्रुदयांत कोरली *** रावांची सुंदर मूर्ती..
सुशील सासू सासरे, सद्गुणी मातापिता
*** रावांचं नाव घेते सर्वांच्याकरिता..
केळीच्या पानावर गाईचं तूप,
*** रावांचं कृष्णासारखं रुप..
पैठणी नको, शालू नको, नको भरजरी शेला,
*** रावांच्या ह्रुदयात जागा भेटली मला..
सासू सासरे भाग्याचे, दीर माझे हौशी,
*** रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे दिवशी..