Birthday Abhar in Marathi | Birthday Abhaar Pradarshan Banner

वाढदिवसाचे आभार मानायचे आहेत? इथे मिळतील १०० पेक्षा जास्त बर्थडे आभार प्रदर्शन इमेजेस आणि स्टेटस ( Thanks For Birthday Wishes in Marathi ). आमच्या या स्पेशल पेजवर आम्ही Birthday Abhar Marathi Messages नेहमी अपडेट करत असतो जेणेकरून तुम्हाला चांगले आणि लेटेस्ट Abhar Pradarshan Sandesh वाचायला मिळतील..

वाढदिवस हि एक अशी पर्वणी असते कि सर्वजण या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाढदिवसाच्या शुभेच्छांचा आपल्यावर वर्षाव होतो, आणि आपल्यालाही वाटते कि या शुभेच्छांची परतफेड म्हणून छोटासा का होईना एक आभार संदेश लिहून सर्वांचे आभार मानावे. वाढदिवसाचे आभार संदेश पाठवणे हे आजच्या काळात योग्यही वाटते कारण आभार संदेश पाठवला म्हणजे आपणही तितकेच त्यांचा मान राखतो हेही आपल्या चाहत्यांना कळते. काहीजण इमेजेस च्या माध्यमातून तर काहीजण व्हिडीओ द्वारे धन्यवाद देणे पसंद करतात. काहीजण आपल्याच प्रभागात मोठी होर्डिंग लावून आभार प्रकट करतात.

आम्ही येथे आपणासाठी घेऊन आलो आहोत एक स्पेशल टूल जिथे तुम्ही स्वतःच्या नावाने आपले आभार बॅनर सोप्या पद्धतीने बनवू शकता. फक्त आपल्याला आवडलेल्या इमेज च्या खाली तुमचे नाव लिहा आणि आपल्या नावाचा बॅनर बनवून आपल्या मित्रांना शेअर करा.

Birthday Abhar Pradarshan in Marathi

माझा वाढदिवस झाला अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन,
एसएमएस, व्हॉट्सअप, फेसबूक, सोशल मिडीया, प्रिंट मिडियाद्वारे
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
आशिर्वादही दिले, त्या सर्वांचा मी आभारी आहे…!!
असेच सर्वांचे प्रेम, सहकार्य, आशिर्वाद, शुभेच्छा सदैव माझ्यावर राहोत
हीच ईश्वरचरणी प्रार्थना ।।
पुनः एकदा धन्यवाद…!

Vadhdivas Abhar Banner

वाढदिवशी किती वय वाढलं यापेक्षा
किती नवीन माणसं जोडली गेली हे महत्वाचं..
आज लक्षात आलं,
माझ्या आयुष्यातील माणसांची गणती अगणित आहे..
आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार!

Birthday Abhar in Marathi

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या
शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
सर्वांचे मनापासून
आभार!

Birthday Abhar Status

मी जर आयुष्यात काही कमावलं असेल,
ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसं..
आपण सर्वांनी मला वाढदिवसाच्या
आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल,
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद..!

Birthday Abhar Banner

ज्या मित्रांनी शुभेच्छा दिल्या,
आणि ज्या मित्रांनी मनातल्या मनात शुभेच्छा दिल्या,
त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो..

Vadhdivas Abhar

वाढदिवसाचे आभार !
आपण वेळात वेळ काढून मला
माझ्या जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा व आशीर्वाद दिलेत,
त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहील..

Abhar Banner Birthday

मनपूर्वक आभार..!
आपण सर्वानी दिलेल्या
वाढदिवसाच्या
शुभेच्छांबद्दल मी आपला
मनपूर्वक आभारी आहे..
स्रेह आहेच,
तो वृद्धिंगत व्हावा,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
धन्यवाद!

Abhar Shubhechha

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या
सदभावना व्यक्त केली त्या सर्व शुभेच्छांचा
मनापासून स्वीकार करतो..!

1 thought on “Birthday Abhar in Marathi | Birthday Abhaar Pradarshan Banner”

  1. तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर, कोणत्याही केक पेक्षा गोड आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत. भरभरून प्रेम देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे मनःपूर्वक आभार.

    Reply

Leave a Comment