
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
Birthday Wishes for Husband Marathi
तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर Gift आहात.
या शुभदिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख,
ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य लाभो एवढीच मनी इच्छा..
आयुष्य सुंदर बनवणार्या सुंदर व्यक्तिला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी बर्थडे डियर!
Birthday Status for Husband Marathi
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आणि आश्चर्य म्हणजे देवाने सर्वकाही मला तुमच्या रूपात दिलं.
कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझं जग आहात.
माझं आयुष्य, माझा सोबती, माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही..
माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Dear Husband Birthday
Dear Husband. You Are My Everything!
I Love You!
Happy Birthday!
Husband Birthday Marathi
Dear Husband तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Dear Navroba Birthday
डिअर नवरोबा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Priy Navrya Birthday
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Priy Patidev Birthday
प्रिय पतीदेव तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
तुम्ही तुमच्या नवऱ्याला काय नावाने हाक मारता? आम्हाला खाली फेसबुक कंमेंट लिहून कळवा आम्ही त्या नावाची Image बनवून इथे पोस्ट करू.

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
मुलीच्या वाढदिवसाला शुभेच्छा
Mulichya Vadhdivsala Shubhechha

तुमचे प्रेम असेच माझ्यावर राहू दे,
आपल्या प्रेमाचे नाते असेच कायम फुलु दे..
तुमच्यामुळे मला अनेक नाती लाभली,
आई बाबा बहिणीची माया मला तुमच्यात दिसली..
तुम्ही होते म्हणून हे घर माझे आपले झाले,
माझ्यातला चांगल्या गुणांचे तुम्ही कौतुक केले..
तुमची अर्धांगिनी होण्याचा अभिमान आहे..
असेच प्रेम जन्मभर राहो हेच तुम्हास मागणे आहे,
तुम्ही नेहमीच मला समजून घेतले..
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
Patila Vadhdivsachya Shubhechha Marathi

बाबा तुमच्यामुळे मी आज येथे आहे
तुम्ही रात्र-दिवस माझ्या भविष्यासाठी झटले
तुमच्या कष्टातून माझे आनंदवन फुलले
मला एक चांगले जीवन लाभले
तुमच्या मेहनतीने हे सारे घडले
चंदन रुपी देह माझ्यासाठी झिजवला
दिवा होऊन माझ्यातला अंधकार विझवला
तुमचे आरोग्य अक्षय राहो हीच सदिच्छा…
बाबा तुम्हांला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
Babana Vadhdivsachya Shubhechha Marathi

तुझा माझा सहवास हा सात जन्मीचा आहे,
हे आता मला खरं वाटायला लागलं आहे..
मी न बोलताच तुला सगळं समजतं,
तू सगळ्याच ठिकाणी माझी बाजू सांभाळते,
याचे मला नेहमीच कौतुक वाटते..
तू आहेस म्हणून घराचा डोलारा दिमाखात उभा आहे,
तुझ्या कामाचा मला नेहमीच हेवा आहे..
तू इतकी कसं काय सांभाळते?
तुझ्याशी केलेल्या भांडणात निराळीच मज्जा असते,
चूक तुझी असली तरी माफी मलाच मागायची असते..
तुझ्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ आहे,
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आहे !!
Patnila Vadhdivsachya Shubhechha Marathi

आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे.
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.
तू माझ्या आयुष्याला वळण दिले
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले.
किती गाऊ आई तुझी थोरवी
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही..
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे मागणे आहे..
आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
Aai La Vadhdivsanimitta Shubhechha

तुझ्यासाठी माझे आयुष्य पणाला लावीन,
तू शिकवलेली शिकवण नेहमीच लक्षात ठेवीन..
आई-बाबा नंतर तूच माझं पहिलं दैवत,
कठीण प्रसंगी कोणत्याही तू लगेच येतो धावत..
तूच माझा सखा, तूच सच्चा दोस्त,
तुझ्यासारखा भाऊ मिळायला खूप नशीब लागतं..
तुला जे जे हवे ते ते मिळो हीच देवाकडे इच्छा,
दादा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
Birthday Wishes Big Brother in Marathi

आमच्या येथे खंडोबा कृपेने आमचा पुत्र,
कुमार देव याचा पहिला वाढदिवस समारंभ
गुरुवार दिनांक २७/१२/२०१८ रोजी सायंकाळी ७:३०
वाजता करण्याचे योजिले आहे,
तरी आपण सहपरिवार उपस्थित राहून,
बालकास शुभ आशीर्वाद द्यावेत,
हि नम्र विनंती!
निमंत्रक: कैलास शिरसाट आणि भाग्यश्री शिरसाट.
पत्ता: प्रियंका हॉल, सेक्टर-०१, ऐरोली, नवी मुंबई.
Blank Birthday Invitation Card
Read More – Happy Birthday Wishes in Marathi
Vadhdivas Invitation Card

आपण खूप ठरवतो..
एखादा क्षण अगदी मनापासून जगायला,
त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं..
पण,
पण नशीब हि अशी गोष्ट आहे,
जिथे कोणाचंच काहीच चालत नाही !
मी खूप प्रयत्न करूनही मला,
त्या क्षणांचं साक्षीदार होता आलं नाही..
त्याबद्दल क्षमस्व!
पण तू वाईट वाटून घेऊ नकोस,
कारण माझ्या शुभेच्छा
सदैव तुझ्या पाठीशी होत्या, आहेत आणि असतीलही..!
उशिरा वाढदिवसाच्या शुभेच्छा

सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली
आईच वाटतेस..
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!
Vadhdivsachya Hardik Shubhechha Didi

लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे..
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…
Birthday Status Marathi
तुम्हाला मराठी भाषेतील सर्वात चांगला वाढदिवस संदेश पाठवायचा आहे का? असे करण्यासाठी आपणास योग्य शब्द सापडत नाहीत का ? आपण हे कसे करावे याबद्दल जास्त काळजी करत आहात? आपणास असे वाटत असेल की मराठीत वाढदिवसाचे स्टेटस शोधण्यासाठी आणि पाठविण्यासाठी आपल्याकडे एखादी योग्य वेबसाइट असती तर ते तुमच्यासाठी अधिक चांगले झाले असते. यासाठी काळजी करण्याची गरज नाही . याचे समाधान आपल्यापासून फार दूर नाही. हे आपल्यापासून फक्त काही माउस क्लिक किंवा बोटांच्या टोकावर आहे. Hindimarathistatus, या प्रकारातील स्टेटससाठी मराठीमध्ये उत्कृष्ट असे पोर्टल आहे. यामध्ये आम्ही हिंदी आणि मराठी भाषेतील सर्वात चांगले आणि अत्यंत प्रेमळ संदेश, कोट्स आणि शुभेच्छा संग्रह संग्रहित केले आहेत.
ह्यातील शुभेच्छा संदेश नक्कीच आपल्या हृदयाला स्पर्श करतील आणि वाढदिवस असलेल्या व्यक्तीबरोबर मानसिक आणि भावनिक संबंध स्थापित करण्यात मदत करतील .