Navryacha Vadhdivas | Birthday Wishes for Husband Marathi
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
Birthday Wishes for Husband Marathi
तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर Gift आहात.
या शुभदिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख,
ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य लाभो एवढीच मनी इच्छा..
आयुष्य सुंदर बनवणार्या सुंदर व्यक्तिला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी बर्थडे डियर!
Birthday Status for Husband Marathi
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आणि आश्चर्य म्हणजे देवाने सर्वकाही मला तुमच्या रूपात दिलं.
कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझं जग आहात.
माझं आयुष्य, माझा सोबती, माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही..
माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Dear Husband Birthday
Dear Husband. You Are My Everything!
I Love You!
Happy Birthday!
Husband Birthday Marathi
Dear Husband तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Dear Navroba Birthday
डिअर नवरोबा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Priy Navrya Birthday
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Priy Patidev Birthday
प्रिय पतीदेव तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
तुम्ही तुमच्या नवऱ्याला काय नावाने हाक मारता? आम्हाला खाली फेसबुक कंमेंट लिहून कळवा आम्ही त्या नावाची Image बनवून इथे पोस्ट करू.
मुलीच्या वाढदिवसाला शुभेच्छा
येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
मुलीच्या वाढदिवसाला शुभेच्छा
Mulichya Vadhdivsala Shubhechha
पतीला वाढदिवसाच्या मराठीतून शुभेच्छा
तुमचे प्रेम असेच माझ्यावर राहू दे,
आपल्या प्रेमाचे नाते असेच कायम फुलु दे..
तुमच्यामुळे मला अनेक नाती लाभली,
आई बाबा बहिणीची माया मला तुमच्यात दिसली..
तुम्ही होते म्हणून हे घर माझे आपले झाले,
माझ्यातला चांगल्या गुणांचे तुम्ही कौतुक केले..
तुमची अर्धांगिनी होण्याचा अभिमान आहे..
असेच प्रेम जन्मभर राहो हेच तुम्हास मागणे आहे,
तुम्ही नेहमीच मला समजून घेतले..
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
Patila Vadhdivsachya Shubhechha Marathi
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबांना
बाबा तुमच्यामुळे मी आज येथे आहे
तुम्ही रात्र-दिवस माझ्या भविष्यासाठी झटले
तुमच्या कष्टातून माझे आनंदवन फुलले
मला एक चांगले जीवन लाभले
तुमच्या मेहनतीने हे सारे घडले
चंदन रुपी देह माझ्यासाठी झिजवला
दिवा होऊन माझ्यातला अंधकार विझवला
तुमचे आरोग्य अक्षय राहो हीच सदिच्छा…
बाबा तुम्हांला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
Babana Vadhdivsachya Shubhechha Marathi
मराठी मधील वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि वाढदिवस स्टेटस
वाढदिवस हा नेहमी वाढदिवस असलेल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी खूप विशेष असतो आणि तेवढाच त्याच्या किंवा तिच्या प्रियजनांसाठी महत्वाचा असतो. हा विशेष दिवस वर्षातून एकदाच येत असल्याने त्यांना तो भव्यतेने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करणे खूप आवडते. वाढदिवसाला बर्थडे बॉय किव्हा बर्थडे गर्ल बद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना वाढदिवसाचे स्टेटस आणि शुभेच्छापत्र पाठविणे सर्वांनाच आवडते.
काही वेळा असे होते कि आपणास शूभेच्छा देण्यासाठी शब्द सुचत नाहीत किव्हा आपल्या भावना त्यांच्यापर्यंत कोणत्या शब्दात पोहचवाव्या हे सुचत नाही, तुम्हीदेखील अश्या स्थितीमध्ये असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
जोपर्यंत हिंदी मराठी स्टेटस वेबसाईट इंटरनेटवर उपलब्ध आहे तोपर्यंत मराठी आणि हिंदी भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. आपल्या पूर्ण उत्साहाने वाढदिवसाच्या वाढदिवस असलेल्या मित्रांची किव्हा मैत्रिणीची प्रशंसा करा. आपल्या भावनांना सशक्त शब्दांत चाल देऊन आपल्या मित्र, कुटुंबातील सदस्यांना आणि परिचितांना अत्यंत हृदयपूर्ण आणि प्रेमळ मार्गाने आनंदमय अश्या मराठी शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा.
आपल्या भावना अत्यंत प्रेमळपणे व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे अपडेटेड हिंदी आणि मराठी स्टेटसचा खजिना आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याच भाषेत (मराठी) पाठवून त्यांना आनंदित करा. बर्थडे बॉय किव्हा गर्ल ला सांगा की हा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे आणि आपल्याला या खास दिवसात खरोखर आनंद झाला आहे. आमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मराठीतील चारोळ्या आणि संदेश विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, ट्विटर, पिंटरेस्ट आणि इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप) वर आपण शेयर करू शकता. आपल्याला त्यासाठी एक पैसेही देण्याची आवश्यकता नाही. हे पूर्णपणे विनामूल्य आहे.