Birthday Wishes for Wife Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हा फोटो बॅनर एडिट करा


बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जर मराठी संदेश शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या पानावर आम्ही काही निवडक असे Birthday Wishes for Wife in Marathi घेऊन आलो आहोत. नेहमीच पत्नी ची तक्रार असते कि तुम्ही तिला वेळ देत नाही, तर आजचा दिवस पत्नीला वेळ द्या आणि तिला Happy Birthday Bayko बोलायला विसरू नका. आणखी अश्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहण्यासाठी आमच्या लोकप्रिय Birthday Wishes Marathi पेज ला भेट द्यायला विसरू नका.

Wife Birthday Wishes in Marathi

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको!


Happy Birthday Bayko

Wife Birthday Wishes


Read More – Birthday Wishes in Marathi


बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
LOVE YOU BAYKO!

Happy Birthday Bayko


पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
बायको तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!


बायकोचा वाढदिवस शुभेच्छा

तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको!


Bayko Cha Vadhdivas Shubhechha

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी..
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ
व सर्वांची काळजी घेणाऱ्या..
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

Bayko Cha Vadhdivas Shubhechha


Birthday Status for Wife Marathi

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


Happy Birthday Wife Marathi

तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
I Love You So Much Dear!


Tila Vadhdivsachya Shubheccha

तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!


Marathi Birthday Status for Her

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!


Marathi Birthday Status for Girlfriend

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले..
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले..
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!


Happy Birthday Wife Images Marathi

माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY DEAR Wife!

Happy Birthday Wife Image Marathi


Baykola Wadhdiwasachya Shubhechha

माझ्या घराला घरपण आणणारी,
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

Baykola Wadhdiwasachya Shubhechha

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको मराठी
Vadhdivsachya Hardik Shubhechha Bayko Marathi

Birthday Wishes for Wife in Marathi

मला जाणणारी तू..
मला समजून घेणारी तू..
मला जपणारी तू..
माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस तू..
माझ्या जगण्यातला अर्थ तू..
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!


कधी हसणार आहे,
कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे…
मी सोबत हात कायमचा,
तुझा धरणार आहे..
🎂🎁माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा..🎁🎂


Bayko Birthday Wishes Marathi

वर्षाचे 365 दिवस,
महिन्याचे 30 दिवस,
हफ्त्याचे 7 दिवस,
आणि माझ्या आवडीचा
1 दिवस तो म्हणजे,
तुझा वाढदिवस म्हणून,
बायको तुला वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा…!!!


सदैव तू सोबत असावीस, हीच आहे गरज..
डोळ्यात पाहा माझ्या, बोलतोय अगदी खरंच..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


या पानावरील सर्व Wife Birthday Wishes in Marathi तुम्हाला आवडले असतीलच. सर्व पुरुषांना विनंती आहे कि जर तुम्ही खरंच आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत असाल तर खाली दिलेला लेख वाचायला आणि त्यावर कंमेंट द्यायला विसरू नका.

Happy Birthday Wishes for Wife in Marathi SMS


Happy Birthday Bayko Status


पत्नी असूनही
केवळ एक पत्नी म्हणून नव्हे,
तर त्याहूनही अधिक
एक मैत्रीण म्हणून तू मला,
अधिक जवळची वाटतेस..
आपल्या नात्यात जो ताजेपणा आहे,
तो केवळ तुझ्या या
खट्याळ स्वभावामुळे !
आज या वाढदिवसानिमित्त
माझ्याकडून तुला हे
प्रेमाचं शुभेच्छापत्र..
आणि सोबत खूप खूप प्रेम!


Marathi Greeting Card for Wife Birthday

Birthday Greeting Card Marathi for Wife
बायकोसाठी मराठी वाढदिवस शुभेच्छा पत्र

आणखी वाचा – Wife Birthday Wishes in English


बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधताय?
अहो पण आधी बायकोला समजून तर घ्या…

बायको ला अर्धांगिनी हि म्हंटले आहे, कारण बायको हे पतीचे अर्धे अंग आहे कारण ती सर्व सोडून एका नवीन घरात येते तेव्हा त्या घरालाच आपले घर मानते, पतीची बहीण तिची बहीण, पतीच्या भावाला आपले भाऊ मानते आणि तिचे सासू सासरे म्हणजेच तिचे आई वडील.

अर्धांगिनी शब्दाची उत्पत्ती शिवाच्या अर्धनारेश्वर रूपातून झाली. प्रत्येक स्त्रीमध्ये अर्धा पुरुष आणि प्रत्येक पुरुषामध्ये अर्धी स्त्री लपलेली आहे. पत्नी पतीचे पतन होण्यापासून वाचवते म्हणून तिला पत्नी नाव दिले गेले आहे. तसेच संपूर्ण परिवाराचे भरन-पोषण करते म्हणून भार्या नाव दिले गेले आहे. अर्धांगिनी बनून पत्नी नेहमी परिवाराच्या संकटाशी लढत राहते, तर कधी परिवार खुश ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहते. पतीच्या सुखदुःखात नेहमी साथ देणारी अशी हि अर्धांगिनी सगळ्यांच्या आनंदासाठी आपला आनंद मात्र बाजूलाच ठेवते.

प्रत्येक पुरुषाला आपली पत्नी नेहमी त्रासदायक वाटते कारण ती नेहमी त्याला नको असलेल्या गोष्टी करण्यापासून रोखते. त्याच्या अधिकारात जगत नाही, त्याला घरकामात मदत करायला लावते, त्याला त्याच्या बिझी कामातून थोडा वेळ मागते, कारण तिलाही भावना असतात काही इच्छा असतात, तिलाही शारीरिक त्रास होतो. तिची स्वप्ने पूर्ण करण्याची अपेक्षा ती फक्त आपल्या पतीकडूनच करत असते. तिला हवा असतो तिला समजून घेणारा, तिच्या इच्छा पूर्ण करणारा, तिला वेळ देणारा असा एक सोबती कि ज्याच्याजवळ ती आपले दुःख व्यक्त करू शकते…

काही असो पण पत्नी हि घराचा पाया आहे, तिच्याशिवाय संसाराचा गाडा हलूच शकत नाही. परिवाराचा सांभाळ करणारी, घर स्वच्छ ठेवणारी, मुलांचा अभ्यास घेणारी, सकाळ संध्याकाळ परिवाराच्या नाश्त्याची जेवणाची सोय करणारी, सासू सासऱ्यांचा सांभाळ करणारी, काटकसर करणारी, पतीला व्यसनापासून रोखणारी, पाहुण्यांचा मानसन्मान करणारी अशी बरीच कामे ती पतीच्या सहभागाशिवाय निसंकोच पार पडत असते, अश्या पत्नीला तिच्या हक्काचा एक दिवस द्यावा असे नाही वाटत का?

पत्नीवर प्रेम करत असाल आणि तिला समजून घेत असाल तर तिला तिच्या वाढदिवसाला एक दिवस मोकळेपणा द्या, तिला तिच्या हक्काचा दिवस आनंदाने जगू द्या. ती करणारी सर्व कामे तुम्ही करा, तिच्या त्रासाची कल्पना येईल आणि तिच्याबद्दल अभिमानही वाटेल. आणि हो एक छोटासा गुलाब देऊन आपल्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका..

आम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे पत्नीसाठी वाढदिवसाचे संदेश पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. कोणी पत्नीला लाडाने बायको म्हणतो तर कोणी शोना, कोणी Wife, My Love तर कोणी Darling, Sweetheart.. काहीहि असो पण जेवढ्या लाडाने नाव घेताय तेवढेच प्रेम हि करा… अगदी शेवटपर्यंत…

Birthday Invitation Card Marathi

आमच्या येथे खंडोबा कृपेने आमचा पुत्र,
कुमार देव याचा पहिला वाढदिवस समारंभ
गुरुवार दिनांक २७/१२/२०१८ रोजी सायंकाळी ७:३०
वाजता करण्याचे योजिले आहे,
तरी आपण सहपरिवार उपस्थित राहून,
बालकास शुभ आशीर्वाद द्यावेत,
हि नम्र विनंती!
निमंत्रक: कैलास शिरसाट आणि भाग्यश्री शिरसाट.
पत्ता: प्रियंका हॉल, सेक्टर-०१, ऐरोली, नवी मुंबई.

Blank Birthday Invitation Card


Read More – Happy Birthday Wishes in Marathi


Vadhdivas Invitation Card

Birthday Wishes for Sister Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली
आईच वाटतेस..
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!


बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जर मराठी संदेश शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या पानावर आम्ही काही निवडक असे Birthday Wishes for Sister in Marathi घेऊन आलो आहोत. नेहमीच बहिणीची तक्रार असते कि तुम्ही तिला बायको आल्यापासून आधीसारखा वेळ देत नाही, तर आजचा दिवस बहिणीला वेळ द्या आणि तिला Happy Birthday My Sister बोलायला विसरू नका.

Birthday Wishes for Tai Marathi

तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल,
मी खरंच भाग्यवान आहे..
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की,
तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई..


आईने जन्म दिला,
ताईने घास भरवला,
सोबत नसताना आई,
ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला.
अशा माझ्या मोठ्या ताईस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Happy Birthday Dear Sister

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली..!
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

Happy Birthday Sister Marathi

फूलों का तारों का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है..
माझ्या प्रिय बहिणीला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Happy Birthday Didi Marathi

दिवस आहे आज खास..
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..
दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

नेहमी माझी काळजी घेणारी,
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणारी,
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..


बहिणीचा वाढदिवस शुभेच्छा

प्यारी बहना…😂
लाखों में मिलती है तुझ जैसी 👧 बहन,
और
करोड़ो में मिलता है मुझ जैसा 🧒 भाई…
😜😂😂
🍬🎂हेप्पी बर्थ डे बहना… सदा हँसती रहना…🎂🍬


Didi Cha Vadhdivas Shubhechha

हजारो नाते असतील,
पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बहीण..
😍 हॅपी बर्थडे दीदी🌼🎂🏵️


Birthday Status for Sister Marathi

आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो,
आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो…
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


Happy Bday Sister Marathi

प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखी बहीण द्यावी हीच माझी इच्छा..
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Bahinila Vadhdivsachya Shubheccha

सर्वात वेगळी आहे माझी बहीण,
सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण,
माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे
माझी बहीण…
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


Marathi Birthday Status for Sister

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!


Marathi Funny Birthday Status for Sister

जिला फक्त पागल नाही
तर महा-पागल हा शब्द सूट होतो
अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Happy Birthday Dear Sister Images Marathi

प्रत्येक क्षणी भांडणारी,
बाबांना सतत नाव सांगणारी,
वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी..
अशा माझ्या क्यूट बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


Bahinila Wadhdiwasachya Shubhechha

आयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नांना बहर येऊ दे,
तुझ्या प्रयत्न आणि आशा आकांशांना भरभरून यश मिळू दे,
परमेश्वराजवळ एकच इच्छा माझ्या ताईला उदंड आयुष्य लाभू दे..
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Birthday Wishes for Tai Marathi

जे जे हवं ते ते तुला मिळू दे,
तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे,
देवाकडे फक्त एकच मागणं आहे.
तुझ्या वाढदिवसा दिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे.
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂


Birthday Wishes for Sister in Marathi

या पानावरील सर्व Sister Birthday Wishes in Marathi तुम्हाला आवडले असतीलच. सर्व भावांना विनंती आहे कि जर तुम्ही खरंच आपल्या बहिणीवर खूप प्रेम करत असाल तर खाली दिलेला लेख वाचायला आणि त्यावर कंमेंट द्यायला विसरू नका.


Bhavacha Vadhdivas | Birthday Wishes for Brother

लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे..
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबांना

बाबा तुमच्यामुळे मी आज येथे आहे
तुम्ही रात्र-दिवस माझ्या भविष्यासाठी झटले
तुमच्या कष्टातून माझे आनंदवन फुलले
मला एक चांगले जीवन लाभले
तुमच्या मेहनतीने हे सारे घडले
चंदन रुपी देह माझ्यासाठी झिजवला
दिवा होऊन माझ्यातला अंधकार विझवला
तुमचे आरोग्य अक्षय राहो हीच सदिच्छा…
बाबा तुम्हांला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

Babana Vadhdivsachya Shubhechha Marathi

मराठी मधील वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि वाढदिवस स्टेटस

वाढदिवस हा नेहमी वाढदिवस असलेल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी खूप विशेष असतो आणि तेवढाच त्याच्या किंवा तिच्या प्रियजनांसाठी महत्वाचा असतो. हा विशेष दिवस वर्षातून एकदाच येत असल्याने त्यांना तो भव्यतेने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करणे खूप आवडते. वाढदिवसाला बर्थडे बॉय किव्हा बर्थडे गर्ल बद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना वाढदिवसाचे स्टेटस आणि शुभेच्छापत्र पाठविणे सर्वांनाच आवडते.

काही वेळा असे होते कि आपणास शूभेच्छा देण्यासाठी शब्द सुचत नाहीत किव्हा आपल्या भावना त्यांच्यापर्यंत कोणत्या शब्दात पोहचवाव्या हे सुचत नाही, तुम्हीदेखील अश्या स्थितीमध्ये असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

जोपर्यंत हिंदी मराठी स्टेटस वेबसाईट इंटरनेटवर उपलब्ध आहे तोपर्यंत मराठी आणि हिंदी भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. आपल्या पूर्ण उत्साहाने वाढदिवसाच्या वाढदिवस असलेल्या मित्रांची किव्हा मैत्रिणीची प्रशंसा करा. आपल्या भावनांना सशक्त शब्दांत चाल देऊन आपल्या मित्र, कुटुंबातील सदस्यांना आणि परिचितांना अत्यंत हृदयपूर्ण आणि प्रेमळ मार्गाने आनंदमय अश्या मराठी शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा.

आपल्या भावना अत्यंत प्रेमळपणे व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे अपडेटेड हिंदी आणि मराठी स्टेटसचा खजिना आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याच भाषेत (मराठी) पाठवून त्यांना आनंदित करा. बर्थडे बॉय किव्हा गर्ल ला सांगा की हा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे आणि आपल्याला या खास दिवसात खरोखर आनंद झाला आहे. आमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मराठीतील चारोळ्या आणि संदेश विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, ट्विटर, पिंटरेस्ट आणि इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप) वर आपण शेयर करू शकता. आपल्याला त्यासाठी एक पैसेही देण्याची आवश्यकता नाही. हे पूर्णपणे विनामूल्य आहे.