जगात मैत्री ला प्रेमापेक्षाही उच्च स्थान आहे, कारण प्रेम धोका देते पण मैत्री नाही, प्रेमात अपेक्षा असतात पण मैत्रीत नाही.. प्रेमात जेव्हा दुःख मिळते तेव्हा सावरायला मैत्रीच पुढे येते, म्हणून आयुष्यात २-४ चांगले मित्र तरी प्रत्येकाने नेहमी जोडावेत.. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मित्रच तर आपली साथ देत असतात. मित्र नसतील तर दिवस अंधारासारखा वाटतो. मित्रांशिवाय जीवन अपूर्ण आहे..

सकाळच्या शुभेच्छा देण्यासाठी मित्रांची बरीच मोठी लिस्ट आपल्या मोबाईल मध्ये असते. शाळा ते ऑफिस पर्यंत च्या जीवनात सोबतीला मित्र किव्हा मैत्रीण हवी असते. आपले छोटे छोटे सीक्रेट शेअर करायला मित्रच जवळचे वाटतात, मनातील दुःख हलकं करायला आणि समजून घ्यायला मित्रांसारखं विश्वासू कोणीच नसतं. कठीण प्रसंगात साथ दयायला मित्रांच्या मदतीचीच तर अपेक्षा असते. लग्नात नाचायला मित्रच हवे असतात, आयुष्यातील प्रत्येक आनंदोउत्सव साजरा करायला मित्रांशिवाय शोभा येत नाही..

आई बाबा हे आपल्या अगदी जवळचे असले तरी काही गोष्टी अश्या असतात ज्या आपण आई बाबांबरोबर शेअर करू शकत नाही, त्या आपण मित्रांबरोबर शेअर करतो.. मित्र म्हणजे एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी असते, मित्र म्हणजे समोरच्याच्या मनाची काळजी घेणं असतं, एक असं अनमोल नातं जे रक्ताचं नसलं तरी सुखदुःखात साथ देणारं असतं.. मित्राची काळजी करत असाल आणि मित्राला सर्वस्व मानत असाल, तर तुमच्या मित्राला एखादा छान Friendship Message पाठवून त्याचे तुमच्या जीवनात आल्याबद्दल आभार मानायला विसरू नका.. संपत्तीचा नाश होऊ शकतो पण मित्रधन हे कधीच संपत नाही, म्हणून ते जपून ठेवा…

No posts found.