गणपती विसर्जन | Ganesh Visarjan Status Quotes Wishes Marathi

3 Min Read

आज गणपती विसर्जन! ( Ganesh Visarjan ) गणरायाचा निरोप घेण्याचा शेवटचा दिवस. ज्या उत्साहात गणेशाचे आगमन घरोघरी होते, त्याच उत्साहात गणेश उत्सवाची सांगता करण्याचा दिवस आज सर्वत्र ढोल ताशा गुलाल आणि नाचत गाजत साजरा केला जातो. मनात जरी त्याच्या जाण्याचे दुःख असले तरी तू पुढल्या वर्षी लवकर ये अश्या गजरात त्याच्या पुढच्या वर्षीच्या आगमनाची आतुरता मनात ठेवून भक्त आनंदाने त्याला निरोप देत असतो. दीड दिवसाच्या गणपतीपासून ते १० दिवसाच्या गणपती उत्सवात त्याची कृपा आपल्यावर सतत राहावी यासाठी प्रत्येक भक्त त्याला साकडे घालत असतो.

आज विसर्जनाच्या दिवशी काही चुकले असेल तर त्याची क्षमा मागुया आणि त्याच्या कृपेची सावली आपल्यावर सतत राहो अशी श्रीचरणी प्रार्थना करूया. इथे आम्ही तुच्यासाठी काही खास निवडक असे गणेश विसर्जन स्टेटस / Ganesh Visarjan Quotes in Marathi पोस्ट केले आहेत, आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.


Ganpati Visarjan Status Marathi

Bappa Aamhala Naka Visru
डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!


Ganesh Visarjan Quotes Marathi

Bappa Pudhlya Varshi Ye Lavkar
आभाळ भरले होते तु येतांना,
आता डोळे भरून आलेत तु जातांना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी ये लवकर…


Ganpati Visarjan Shayari Marathi

Bappa Challe Aaplya Gavala
बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलाच्या तालात
गुलाल रंगात, नेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत
याहो पुढल्या वर्षाला…


Ganpati Bappa Visarjan Quotes Marathi

Pudhchya Varshi Lavkar Ya
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना…
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या !!


गणपती विसर्जन Status


रिकामे झाले घर,रिकामा झाला मखर..
पुढच्या वर्षी लवकर येण्यास,
निघाला माझा लंबोदर..
गणपति बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया..
गणपती चालले गावाला,
चैन पड़ता आम्हाला…!


Ganpati Bappa Visarjan Status in Marathi

गणेश विसर्जन निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा !


Ganesh Visarjan Message in Marathi

“बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना”
गणपती बाप्पा मोरया..!
पुढच्या वर्षी लवकर या!!


दाटला जरी कंठ तरी,
निरोप देतो तुला हर्षाने..
माहीत आहे मला देवा,
पुन्हा येणार तु वर्षाने..!
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
पुढच्या वर्षी लवकर या..!!


निरोप देऊ आज आनंदानं,
सेवा करण्याचा प्रयत्न केला लेकरानं..
काही चुकलं असेल तर देवा,
माफ कर आम्हाला मोठ्या अंत:करणानं..🙏


गणेश विसर्जनाच्या दिवशी,
सर्व भक्तांच्या आयुष्यातील वेदना, दु:ख कमी होवो,
हिच बाप्पा चरणी प्रार्थना..

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *