Hartalika Wishes Marathi | हरतालिका शुभेच्छा मराठी

हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा ( Hartalika Wishes in Marathi )

हरतालिकेचे व्रत सर्वात आधी माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते. हरतालिकेचे व्रत केल्याने महिलांना सौभाग्याची प्राप्ती होते. हरतालिकेचे व्रत कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी आणि सुवासिनी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करतात. व्रताच्या दिवशी अन्न आणि जलाचा त्याग केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी ग्रहण करून हे व्रत सोडले जाते. सर्व व्रतांमध्ये हरतालिका व्रत हे सर्वात कठीण व्रत आहे. जर एखादी कुमारी मुलगी आपल्या विवाहाच्या अपेक्षेने हे व्रत करत असेल तर तिचा लवकर विवाह होऊ शकतो. मनासारखा पती मिळण्यासाठी देखील हे व्रत केले जाते. जर एखादी स्त्री खऱ्या मनाने हे व्रत करत असेल तर तिला भगवान शिवाच्या आशीर्वादाने अखंड सौभाग्यवतीचे वरदान मिळते. हरतालिकेच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा..!


Hartalikechya Hardik Shubhechha

संकल्प शक्तीचे प्रतीक,
अखंड सौभाग्याची प्रार्थना,
हरितालिका सणानिमित्त,
पूर्ण होवो तुमच्या मनोकामना..
हरितालिकेच्या भावपूर्वक शुभेच्छा..!


Hartalika Shubhechha

शिव व्हावे प्रसन्न..
पार्वतीने द्यावे सौभाग्यदान..
हरतालिका व्रताच्या शुभेच्छा..!


हरितालिका तृतीया

तुझ्या मनी आहे जी एक आशा,
होऊ नये तुझी निराशा..
सर्व इच्छांची पूर्ती होवो,
समृद्धी घेऊन येवो हरतालिका..
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!


Hartalika Sakal


Hartalika Wishes Marathi

हरतालिका तृतीया निमित्त,
सर्व माता भगिनी आणि
कुमारिकांना मंगलमय शुभेच्छा..!
शुभ सकाळ..!


हरितालिका हा सण
तुमच्या जीवनात नव चैतन्य आणो..
तुमच्या सौभाग्य आणि परिवारचे सुकल्याण होवो,
आपणांस व आपल्या परिवारास,
हरितालिका तृतीया निमित्त मंगलमय शुभेच्छा..!!


🙏हरतालिका पूजा🪔 – 9 सप्टेंबर
कुमारीकांना सुयोग्य वरप्राप्ती
आणि सुहासिनींना अखंड सौभाग्य प्राप्ती
अशा प्रवित्र हेतुने केल्या जाणाऱ्या
हरतालिका या व्रताच्या व सणाच्या
सर्वं माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा..!


सण सौभाग्याचा, पतीवरील प्रेमाचा,
तुमच्या सौभाग्याला,
अक्षय आनंदासह दिर्घायुष्य लाभो..
हरितालिकेच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏


करुनी मनोभावे पूजा शंकराची, प्रसन्न करावे त्याला,
पतीला मिळावे दीर्घायुष्य, म्हणून करावी हरतालिका..
तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा..!
🌺🙏🙏🙏🙏🙏🌺

Leave a Comment