100+ लाईफ स्टेटस मराठी | Life Status In Marathi | Life Quotes In Marathi.

Life Status In Marathi/ जीवनावर मराठी स्टेटस

माणसाला काहीही अशक्य नाही, पण खेदाची गोष्ट म्हणजे, त्याच्यात कितीतरी शक्ती आहेत त्यावर त्याचा स्वतःवर विश्वास नाही. माणसाने आपल्या मनाच्या खोलात गेले तर त्याच्यातील शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तो अशक्य कामेही शक्य करू शकतो.
प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतात. तरीही आपल्या जीवनात कशीही परिस्थिती असली तरीही आपण आपले जीवन आनंदाने व सुखाने जगले पाहिजे.आजच्या पोस्टमध्ये आम्ही सुंदर जीवनावर सुविचार घेऊन आलो आहोत.

आजच्या पोस्टमध्ये जीवनावर मराठी स्टेटस,Life Status In Marathi,Life Quotes In Marathi,Life Message In Marathi, Life Sms In Marathi, Best Life Status In Marathi,Marathi Suvichar On Life In Marathi, इत्यादी collections आहेत.

Life Status In Marathi

Life Status In Marathi

काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात
सगळ्या धरून ठेवल्या की मग
पसारा होतोच
गोष्टींचाही आणि आयुष्याचाही.

आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा
फायदा घ्यावा पण
कोणाच्या विश्वासाचा फायदा घेऊ नये
कारण
एकदा विश्वासाला तडा गेला की
नात्यात एक गाठ कायमची निर्माण होते.

जीवनात पैसा कधीही कमवता
येतो पण निघून गेलेला वेळ
आणि निघून गेलेली
व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही.

जीवनाचे पाच सत्य
1)आईसारखा विश्वासू या जगात कोणी नसतो
2) गरीबाचा कोणी मित्र असु शकत नाही.
3) आज पण लोकं चांगल्या माणसाला महत्व देत नाही त्याचा चांगल्या चेहऱ्याला महत्व देतात.
4) या जगात आदर फक्त पैश्याचा होतो माणसाचा नाही.
5) ज्या माणसाला आपण आपल्या सर्वात जवळच समजतो तोच माणूस आपल्याला अधिक त्रास देतो.

एखाद्याला खुप जीव लावुन
पण तो आपल्याला वाईट
व्यक्ती समजतो हे कळल्यावर
खुप दुःख होत…

शांत राहून निरीक्षण करायला
शिका प्रत्येक
गोष्टीला प्रतिकार देणं
गरजेचं नसतं..!

जबाबदारी वय पाहुन येत
नाही पण
खांदे मात्र मजबूत
करुन जाते..!

तिच्यावर कोणतंच संकट येऊ देऊ नका
जिच्या गर्भात तुम्ही नऊ महिने
वास घेतलाय..!

मी येवढा वाईट आहे पण आज पर्यंत
कोणत्याही मुलींनी मला बघुन मान खाली
नाही घातली..!

कुणाच्या मागे फिरन
कार्यकर्ता होण्यापेक्षा कष्ट
करून राजा बना..!

नाव कधी गाजत नसतं
ते स्वतःहून
आपल्याला गाजवाव लागतं..

घर छोटं असलं तरी चालेल
पण मन
मात्र मोठं असलं पाहिजे..!

हरताय म्हणून कधीच खेळ सोडू
नका कदाचित शेवटचा निकाल
तुमच्या बाजूने लागले..!

जो पर्यंत जबाबदारी कळत
नाही तोपर्यंत
अंगातली मस्ती उतरत नाही..!

Life Quotes In Marathi

Life Quotes In Marathi

आयुष्यात कितीही कमवा पण कधी
गर्व करू नका
कारण,बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर
राजा आणि शिपाई एकाच
डब्यात ठेवले जातात.

इच्छा काहीच नाही फक्त
आई खुश राहायला पाहिजे..!

आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका
कारण त्या शून्या समोर किती
आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे.

होणार की सगळी स्वप्न पूर्ण फक्त
आपण हार नाही मानायची..!

एकटं चालायला लागलो तेव्हा
कळालं कोण आपलं आहे
आणि कोण परक..!

आईला खूप वेळा रडताना
पाहिलंय पण ज्या दिवशी वडील
रडतात तेव्हा काळजावर वार
झाल्यासारखं वाटतं..!

एकटा राहणारा व्यक्ती हा कधीच
एकटा नसतो खरं तर तो सगळ्यांना
ओळखुन बसलेला असतो..!

जास्त प्रामाणीक राहुन काही
मिळत नाही इथं लोक खोटेपणाला
मोठेपणा समजतात..!

मृत्यू हा एकच दिवस असा आहे
की ज्या दिवशी सर्वजण आपल्या
विषयी चांगलं बोलतात..!

‘दोष, विरोध, चर्चा, बदनामी’
भोगल्या शिवाय माणूस मोठा होत नाही.

सगळ्यांना चांगलं समजायचं सोडून
द्या लोकं बाहेरुन दिसतात तसे
आतुन नसतात..!

मोठं व्हायचं तर मनाने श्रीमंत व्हा,
पैशाचा माज आयुष्यभर टिकतं
नसतो शेठ..!

Life Message In Marathi

Life Message In Marathi

योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य
वागणूक
माणसाला त्याच्या विचाराचे
आणि जीवनाचे प्रवाह
बदलण्यास भाग पाडते.

आयुष्यात
त्या व्यक्तीला कधीच
गमावू नका जो तुमच्यावर
रागवल्यानंतर स्वतःहून
तुमच्या जवळ येत असेल.

जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका…
विश्वास, वचन, नाते, मैत्री, प्रेम
कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात….

जग किती ही सुंदर असलं तरी
आमचं मन इथंच रमत..!

माणूस किती मोठा आहे हे महत्त्वाचं
नाही माणसात माणुसकी किती आहे हे
महत्त्वाचं आहे..!

पैश्या समोर नात्यांची तुलना करू नका
कारण वेळ प्रत्येकाची येते..!

शांत राहणे ही सुध्दा एक नशा आहे,
सध्या मी त्याचं नशेत असतो..!

अडचणी सर्वांना असतात तुम्ही त्यांना
कोणत्या नजरेने पाहता यावर तुमचं
यश अवलंबून असतं..!

यशाची उंची गाठताना कामाची कधी
लाज बाळगु नका आणि कस्टला
कधीच घाबरू नका..!

नावापुरती मानसं आणि गरजे पुरती
नाती आयुष्यात नसलेली बरी..!

कोणी कोणाचं नसतं ओ शेठ लोक
फक्त तुमच्या सोबत असल्याचं..!
नाटकं करत असतात

माहिती नाही काय चाललंय आयुष्यात
दिसायला तर सगळं छान दिसतंय पण
आतुन मन खूप दुखतंय..!

वाटण्याआधी रुजावं लागतं
आणि चमकण्याआधी झीजावं लागतं..!

Life Sms In Marathi

Life suvichar in marathi

ठाम राहायला शिकावं
निर्णय चुकला तरी हरकत नाही
स्वतःवर विश्वास असला की
आयुष्य कुठून हि सुरवात करता येते.

फुलपाखरू फक्त १४ दिवस जगते
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून
कित्येक ह्दय जिंकत
आयुष्यातील प्रत्येक क्षण अमूल्य आहे
तो आनंदाने जगा.

आपल्यावर जळणारे जरी परके
असले तरी आग लावणारे मात्र
आपलेच असतात..!

ऐका तासाची किंमत खूप जणांना माहिती
असते पण ऐका घासाची किंमत फक्त एक
भुकेला व्यक्तीचं सांगू शकतो..!

इथे भारी कपडे भारी फोन बघुन लोक श्रीमंत
आहे का नाही याचा अंदाज लावतात..!

परिस्थिती ने गरीब असलात तरी चालेल
पण मनाने मात्र श्रीमंत व्हा..!

शब्द गोड आहे म्हणून लोकांना
आपली ओढ आहे..!

पैशात काही नाही असं म्हणण्यासाठी
पण खिशात पैसा लागतो..!

उपवास करुन जर इच्छा पूर्ण होत असत्या
तर उपाशी पोटी झोपलेला गरीब आज
सगळ्यात जास्त श्रीमंत असता..!

काही माणसं पैश्यानी श्रीमंत आणि
विचारांनी भिकारी असतात..!

धोका कधी मरत नसतो आज तुम्ही देणार
उद्या तुम्हाला पण भेटणार.!

संघर्ष करत रहा, साम्राज्य एका
दिवसात तयार होत नाही..!

Best Life Status In Marathi

Jivnavr status in marathi

राग हा शब्द फार लहान
आहे
पण आयुष्य बरबाद करण्यासाठी
पुरेसा आहे.

आयुष्याचे ५ नियम
१ स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका
२ जास्त विचार करणं बंद करा.
३ भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा
विचार करणं टाळा.
४ दुसरे तुमच्या बद्दल काय बोलतात याचा विचार
करू नका
५ सतत आनंदी रहा .

चाहते कमी झाले तरी चालेल पण
जळणार्यांची संख्या वाढली पाहिजे..!

जिवनात पैसा कधीही मिळवता येतो,
पण निघून गेलेली ‘वेळ’ आणि ‘व्यक्ती’
पुन्हा मिळवता येत नाही..!

थोडे दिवस थांबा शेठ
अजून वेगळे नजारे दाखवणार..!

शेठ इथं एका ताटात खाणारे बदललेत
आणि तुम्ही म्हणता विश्वास असुद्या
आमच्यावर..!

दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण
बनुन कधीच स्वतःच्या सुखाची
अपेक्षा करु नका..!

नशा करून फक्त ती वेळ निघून जाते
स्वतःवर आलेली परिस्थिती
मात्र तशीच राहते..!

नशीबात जी गोष्ट नाही ती
गोष्ट आयुष्यात आणण्यासाठी
प्रयत्न करत रहा..!

पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव
पुसुन टाकु शकतो..!

आईचं कष्ट दिसत नाही पण
आईसारखं कष्ट दुसरं कोणी
करु शकत नाही..!

झेप एवढी उंच घ्यायची आहे ना
बघणार्याचे डोळे नाही माना
फिरल्या पाहिजे..!

जीवनावरील कोट्स मराठी

जिवनात वादळ येणं देखिल
आवश्यक आहे
तेव्हाच तर कळतं कोण आपलं
आहे आणि कोण परकं..!

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल
तर आपण काय आहोत ?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो
याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.

लाख अडचणी आहेत पण
पर्याय मात्र तुच..!

आयुष्यात किती जरी ठोकरे
लागले तरी आपण
आपल्याचं नादात..!

फक्त नितीमत्ता साफ ठेवा
दिवस सगळ्यांचे बदलत असतात..!

सोबत घेऊन त्यांनाच फिरा,
जे तुमच्या गैरहजेरीत पण
तुमची बाजू मांडतील.!

गरीब आहे म्हणून काय झालं
मदतीसाठी हाक मारा जिथे पैसेवाले
कमी पडतील तिथे आम्ही येऊ..!

जेव्हा आपलेच आपल्या विरोधात
जातात तेव्हा माघार न घेता जिद्दीने
उभं राहायची तयारी ठेवा..!

जेव्हा कुटुंबाची जबाबदारी
खांद्यावर येते ना तेव्हा कोणतंच
ओझं भारी नसतं..!

जर ध्येय मोठं असेल ना तर,
प्रयत्न पण मोठेच केले पाहिजेत..!

त्यांनाच महत्व द्या जे तुम्हाला
महत्त्वाचं समजतात..!

जीवनावरील स्टेटस मराठी

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
सगळ आपलंच होत गेल
असत तर
जगण्याची गंमत आणि
देवाची किंमत कधीच समजली नसती.

आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी
लागणार आहे त्यामुळे लोक काय म्हणतील
याचा विचार करणं सोडून द्या..!

पोटासाठी धंदा हा नेहमी लाज आणि
माज सोडून करावा लागतो..!

आपली पाठ नेहमी मजबूत ठेवा
कारण शाब्बासकी आणि धोका नेहमी
पाठीमागूनच दिला जातो..!

आयुष्यात मित्र तर भरपूर भेटतात
पण जो शेवट पर्यंत साथ देतो तोच
खरा मित्र..!

जो दुसन्यांच्या आयुष्याचा तमाशा
बनवतो त्याच्या पण आयुष्याचा
तमाशा नक्कीच होतो..!

वय जरी कमी असलं तरी
नेतृत्व सिद्ध करण्याची ताकद
असली पाहिजे ..!

एक तर कोणाचा हाथ धरायचा
नाही आणि धरला तर आयुष्यभर
सोडायचा नाही..!

जे वेळ देऊ शकत नाहीत,
ते साथ काय देणार..!

ज्यांनी आपल्याला अडचणीत जपलंय
त्यांना आपण आयुष्यभर जपणार..!
शब्द आहे आपला.

जे नाही त्याचा विचार करत बसु नका
जे आहे त्याचा विचार करा
आणि पुढे चालत रहा..!

जीवनावरील मराठी सुविचार

जबाबदारीच ओझ पण काय कमाल
आहे लवकर घेतलं तर हलक जातं आणि
उशीर झाला तर जड जातं..!

मरण आलं तरी ऐटीत असावं
फक्त ईच्छा एकच आहे,
पुढच्या ७ जन्मी सुध्दा आपलं दैवत
छत्रपती शिवाजी महाराज हे असावं..!

पैसा बोलायला लागला की समजुन
जा माणसाची आणि नात्यांची
किंमत संपली आहे..!

राग आल्यावर थोडं थांबल आणि चूक
झाल्यावर थोड नमल तर जगातल्या
सर्व समस्या दूर होतात..!

आयुष्यात जीव लावणारे
शोधा कामापुरते येतीलच
तुम्हाला शोधत..!

सगळे दिवस सारखे नसतात शेठ
वेळ प्रत्येकाला संधी देते..!

माणसं जोडण्यापेक्षा
आता माणसं ओळखणं जास्त
महत्त्वाचं झालंय..!

सगळे महाग झाले
पण काडेपेटीची किंमत एक रुपये
वरती ठाम आहे,
या वरुन तुम्ही एकच लक्षात ठेवा
की आग लावणाऱ्या ची किंमत
कधीच वाटत नाही.

आयुष्य एक महाभारत आहे इथं
कर्णासारखे मित्र निवडावे लागतात
कृष्णासारखे मार्गदर्शन आणि
आपण अर्जुनासारखं सर्वश्रेष्ठ बनुन
लढायचं असतं..!

आमच्याकडुन गोड बोलण्याची
अपेक्षा ठेऊ नका कारण प्रत्येकाला
जशास तसे उत्तर दिले जाईल.

जीवनावरील मेसेज मराठी

आयुष्यात त्यांनाच महत्त्व द्या
जे त्यांच्या आयुष्यात तुम्हाला
महत्त्वाचं समजतात..!

सगळे दिवस सारखे नसतात शेठ
वेळ प्रत्येकाला संधी देते.

हृदय खुप मोठंय शेठ आपलं हसुन
जगतो कुणीही फसवलं तरी..!

दुसऱ्याला बुडवून मोठं होण्याची सवय नाही
मी मोठं, होणार पण स्वतः च्या जिवावर..!

प्रेम आणि मैत्री आम्ही पण केली
प्रेमामध्ये धोका भेटला
आणी मैत्रीमध्ये विश्वासघात..!

कठीण काळात सतत स्वतःला सांगा
शर्यत अजुन संपलेली नाही कारण मी
अजुन जिंकलेलो नाही..!

असेल नसेल कोण तुझं
तु पंखात कायम भरारी ठेव
बदलेल हा एक दिवस तुझा
तु फक्त स्वतःवर विश्वास ठेव..!

सगळे लक्षात आहेत
कोण कसं वागलंय.

प्रेम किती अजिब आहे,
जे वय जीवन जगायचं आहे
त्या वयात मरायचे स्वप्न
दाखवत आहे.

कोणी कसंही वागलं तरी,
आपण प्रेमानेच वागायचं..!

जीवनावरील संदेश मराठी

छोटसं आयुष्य आहे,
ते अशा लोकांसोबत
घालवा जे तुमची
किंमत जाणतात.

शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे
माळी असतात,ते बदलून गेले तरी
आठवणींचे फुल आणि मूल त्यांना
जीवन प्रवासात कधीच विसरत नाही…..

परिस्थिती कशीही असुद्या हो,
फक्त मनात इच्छा पाहिजे
मदत करण्याची.

वेळ ज्या वेळेस न्याय देते
तेव्हा साक्ष आणि पुराव्यांची
गरजच भासत नाही.

नशीब आणि मनाचं कधीच
जुळत नाही कारण जे मनात
असतं ते नशीबात नसतं.

काही नाही मिळालं तरी चालेल पण
आपल्याला खोटं बोलून आणि खोटं वागून
काहीच मिळवायचं नाही..!

जीवनात श्रीमंतीचा साज असावा
पण त्या संपत्तीचा माज नसावा.

आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीच
कायमची नसते
एकतर तीचा काळ संपतो किंवा
आपली वेळ बदलते..!

फक्त जिद्द ठेवा
आयुष्याची सुरुवात कधीही आणि
कुठुनही होऊ शकते..!

परीस्थिती कशीही असुद्या वो
फक्त तुम्हाला तुमची माणुसकी
जपता आली पाहिजे..!

भुतकाळ कसाही असुद्या हो,
भविष्यकाळ आपलाच आहे
लठायचं आणि घडवायचं एवढंच
लक्ष्यात ठेवायचं..!

काट्यांवरुन चालणारी व्यक्ती
ध्येयापर्यंत लवकर पोहचते
कारण रुतनारे काटे पावलांचा
वेग वाढवतात..!

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide जीवनावर मराठी स्टेटस,Life Status In Marathi,Life Quotes In Marathi,Life Message In Marathi, Life Sms In Marathi, Best Life Status In Marathi,Marathi Suvichar On Life In Marathi, etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…