Love Sad Status Marathi | Sad स्टेटस मराठी | Sad Shayari Marathi

4 Min Read

प्रेमाचा शेवट जर,
लग्नानेच झाला असता तर,
आज राधा कृष्णाची,
बायको असती..


तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे,
हे माहित नाही..
पण तू जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस,
तेव्हा खरंच मला करमत नाही..


तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील,
दुःखाचा दिवस असेल आणि,
मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील,
शेवटचा दिवस असेल..


एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो,
तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात,
पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..


एखाद्याला खुप जीव लावुन पण,
तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर,
खुप दुःख होतं..


त्या वेडीला वाटते, ‎मी तिला‬ विसरलो पण,
तिला काय माहीत ‪वेळ‬ आणि ‪काळ‬ बदलला तरी,
पहिले प्रेम विसरता येत नाही..


जेव्हा विश्वास मोडलेला असतो,
तेव्हा SORRY सुद्धा काहीच नाही करू शकत..


आपण कोणावर कितीही प्रेम केलं,
पण त्याचं मन दुसऱ्यात असेल ना,
तर तिथे आपली किंमत शून्य असते..


मी कोणालाच माझ्या आयुष्यातून
दूर करत नाही..
ज्याचं मन भरतं ते आपोआप,
दूर निघून जातात..


ती मला नेहमी म्हणायची किं,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तिचं करूनच सोडलं..


लोकं सहज बदलतात..
कालपर्यंत तर तुम्ही त्यांच्यासाठी
खूप इम्पॉर्टन्ट होते,
आणि आज अचानक नकोसे झालाय..


तुला कधी माझी आठवण आली ना,
तर माझ्यासाठी कधी रडू नको..
कारण मला माझ्यामुळे,
तुझ्या डोळ्यात अश्रू नको आहे..


वेळ निघून गेल्यावर
कदर केली तर ती कदर नाही,
तर तो पश्चाताप असतो..


हो आहे मी थोडा रागीट,
छोट्या छोट्या कारणांवरून चिडतो..
पण त्या चिडण्यामागे माझं प्रेम किती आहे,
हे सुद्धा समजून घेत जा..


सवय होऊन गेलेल्या व्यक्तीला,
विसरणं खूप अवघड असतं..


मला तर वाटलं आम्ही फक्त वेगळे झालो आहोत,
नशीब बघा माझं विसरली ती मला..


नक्कीच ती मला विसरली असेल,
इतके दिवस कोणी नाराज नसतं..


लोकं स्वतःच गैरसमज करून घेतात,
आणि असं दाखवतात की,
तेच बरोबर आहेत आणि आपण चुकीचे..


जेव्हा एखाद्याला तुमच्या असल्याची
किंमत नसते तेव्हा त्याला तुमचं
नसणं काय असतं जाणवून द्या..


तू माझं ते पहिलं प्रेम आहेस,
जे शेवटचं झालं मला..


प्रॉब्लेम एवढाच आहे की,
आपल्याला ते सगळं आठवत राहतं,
जे आपल्याला विसरायचं असतं..


आयुष्याचा प्रवास सुखकर तेव्हाच होतो
जेव्हा जोडीदार सुंदर पेक्षा
समजदार जास्त असतो..


कदाचित मला जास्त प्रेम करता येत नसेल,
पण जेवढं येतं ना तेवढं फक्त तुझ्यावरच करतो..


गैरसमज पण कसली गोष्ट आहे ना..
आज पण वाटतंय की तू
एक दिवस परत येशील..


कधी कधी वाटतं की,
आपली ओळखच झाली नसती,
तर कीती बरं झालं असतं..


आता तुझ्या life मध्ये Option खूप असतील,
पण जेव्हा गरज असेल आणि
तुझ्याजवळ कोणी नसेल ना,
तेव्हा तुला माझं असणं आणि
नसणं म्हणजे काय हे समजेल..


आता इतका दुरावा वाढलाय आमच्यात की,
आता आमची भांडणं सुद्धा होत नाहीत..


Life मध्ये अश्या Situation ला Face करत आहे की,
जिथं मला तिची गरज आहे पण तिला माझी नाही..


ज्या व्यक्तीशिवाय आपण राहूच शकत नाही,
तीच व्यक्ती आपल्याला एक दिवस एकटं जगायला शिकवते..


तुझं माझं नातं जरी संपलं असलं
तरी माझं तुझ्यावरचं प्रेम नाही संपलं..


Actually लोक बदलत नाहीत,
त्यांचा Intrest संपतो..
नाहीतर त्यांना कोणीतरी Intresting भेटतं..


Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *