Love Status Marathi | लव स्टेटस मराठी

प्रेमात पडलाय आणि आपल्या प्रेमळ व्यक्तीसाठी लव स्टेटस शोधताय? आम्ही शोधले आहेत काही निवडक असे 100 प्रेम संदेश जे तुम्हाला नक्की आवडतील. पहिल्यांदा एखाद्याच्या प्रेमात पडला असाल तर ह्या लेखातील Marathi Love Status तुम्हाला नक्कीच आवडतील. पहिल्यांदा प्रेम होणे हि गोष्टच मनाला खूप आनंद देणारी आहे. पहिल्या प्रेमाची आठवण हि आयुष्यभर न विसरणारी असते.. प्रेम असे असावे कि त्या प्रेमाचे रूपांतर हे विवाहात व्हावे आणि त्या प्रेमाचा शेवट गोड असावा, तरच त्या प्रेमाला अर्थ आहे नाहीतर ते प्रेम व्यर्थ आहे..

सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत प्रेमळ व्यक्तीची गोड आठवण आपल्याला त्रस्त करत राहते. तिला पाहिल्याशिवाय, तिच्याशी बोलल्याशिवाय राहवत नाही, सकाळी उठताच तिला एखादा प्रेमाचा संदेश पाठवल्याशिवाय मनाला चैनच पडत नाही, आणि तिनेही त्याचा प्रेमळ शब्दात रिप्लाय द्यावा अशी अपेक्षा असते.. भूक तहान यांचे भानच राहत नाही, आणि दिवस कसा संपला हेही कळत नाही. प्रत्येक क्षण तिच्या विचारात राहावेसे वाटते. तिचे DP, व्हाट्सएप्प स्टेटस पाहत राहावेसे वाटतात.. तिच्या आठवणीत झोप लागत नाही, तिचीच स्वप्ने पडायला लागतात..

प्रेम होणे स्वाभाविक आहे पण ते आकर्षण आहे कि खरे प्रेम हे समजणे देखील तितकेच अवघड आहे, आकर्षणातील प्रेम हे क्षणभंगुर आहे, शारीरिक संबंधानंतर काही दिवसातच त्या व्यक्तीबद्दलची मनातील किंमत कमी होऊ लागते, त्या व्यक्तीबद्दल काही आकर्षण राहत नाही आणि त्या व्यक्तिशिवायही दुसरी व्यक्ती आवडू लागते. याउलट खऱ्या प्रेमात एका व्यक्तीशिवाय दुसऱ्या व्यक्तीचा विचारही मनात येत नाही, कितीही भांडणे, राग असला तरी त्या व्यक्तीवरचे प्रेम जराही कमी होत नाही. खरे प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं, इगो न ठेवता एकमेकांची माफी मागणं. एकमेकांच्या आवडीनिवडी जपणं. एकमेकांचा आदर करणं आणि शेवटपर्यंत एकमेकांना खुश ठेवणं आहे.

प्रेम झाले म्हणून ते टिकेलच असे नाही, ते सर्वस्वी त्या दोन व्यक्तींच्या स्वभावावर अवलंबून आहे. प्रेमाचा शेवट चांगला कि वाईट करणे हे देखील आपल्याच हातात आहे. टिकवणारे असतील तर Offline काय Online प्रेम सुद्धा आयुष्यभर टिकतं. प्रेमात एक हट्टी असला तर दुसरा समजदार असला पाहिजे. प्रेमात जोडीदारावर शंका नको तर संपूर्ण विश्वास असावा, तरच ते प्रेम यशस्वी होईल.. प्रेमात इगो नको, अपेक्षा नको, फक्त जोडीदारावर एवढं प्रेम आणि विश्वास असावा कि शेवटपर्यत त्याने फक्त आपल्यावरच प्रेम करावं..


सगळी दुनिया रुसली तरी चालेल,
पण फक्त माझ्या आईची सून,
रुसली नाही पाहिजे..


प्रत्येक सकाळी ठरवतो विसरून जाईन तुला,
आणि प्रत्येक रात्री आठवल्याशिवाय झोप येत नाही मला..


माझं स्वप्न तुला फक्त मिळवणं नाहीये,
तर आयुष्यभर तुला खुश बघणं पण आहे..


जर टिकवणारे असतील तर Offline काय,
Online प्रेम पण आयुष्यभर टिकतं..


प्रेमात एक हट्टी असेल तर,
दुसरा समजदार असला पाहिजे..


दूर राहून फक्त फोन Msg वर बोलून
ज्यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं,
ते प्रेम खरंच Great असतं..


Oye.. Sun
जिथे जास्त प्रेम होतं
तिथं सर्वात जास्त भांडणं
सुद्धा होतात..


Oye Pillya,
खरा स्वर्ग
तर तुझ्या मिठीत आहे..!


किती सुंदर ती सकाळ असेल,
ज्यादिवशी माझं पिल्लू माझ्या घरी असेल..


प्रेमात एकमेकांना सतवण्यात
आणि मनवण्यातही
एक वेगळीच मज्जा असते..


माझा दिवस तर तेव्हाच छान जातो,
जेव्हा माझं बोलणं तुझ्या सोबत होतं नकटे..


एखाद्याची सवय झाली ना कि
त्याला Call किव्हा Msg केल्याशिवाय,
करमत नाही..


जात वेगळी आहे म्हणून काय झालं?
लग्न झाल्यावर एकच होईल ना…


तू सोबत पाहिजे बस,
बाकी तुझं भांडणं, रुसणं,
सगळं मान्य आहे मला..


खुप भारी वाटतं,
जेव्हा कोणीतरी बोलतं..
स्वतःसाठी नाही तर,
माझ्यासाठी स्वतःची काळजी घे..


खरं प्रेम ते असतं,
ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा,
समोरील व्यक्तीच्या सुखाचा,
जास्त विचार करता..


एकमेकांची चूक विसरून,
एकमेकांना समजून घेणं
हेच खरं प्रेम.


प्रेमात प्रेमामुळे शारीरिक संबंध असावे,
शारीरिक संबंधासाठी प्रेम नसावं..


Crush, Attraction
तीन-चार महिन्यांपूरतेच असते,
पण ते जर त्याहून जास्त असेल,
तर ते प्रेम असते..


Relationship मध्ये,
चंद्र-ताऱ्यांची गरज नसते हो..
गरज असते ती प्रेम, विश्वास
आणि Respect ची..


खरे प्रेम तेच असते,
ज्यामध्ये दोघेही
एकमेकांना गमवायला घाबरतात..


आपल्या GF ला MOVIE बघायला
तर सगळेच घेऊन जातात गं,
पण मला तर तुला बायको बनवून,
जेजुरी ला घेऊन जायचं आहे..


नको माधुरी दिक्षित,
नको जुही चावला..
तु हो म्हणालीस की,
मला देवचं पावला…


खूप प्रेम आहे तुझ्यावर,
प्लीज, कधी बदलू नकोस..
सहन नाही होणार..


जर दोघे मनापासून,
खरं प्रेम करत असतील ना,
तर त्यांना कोणीच अडवू शकत नाही,
मग ती जात असो किंवा घरचे..


आजकाल झोप कमी,
तुझी आठवणच
जास्त येतेय..


रोज रोज गोड बोलुन,
मुंग्या लागतील ना आपल्या नात्याला..
म्हणून कधीतरी भांडण करावं लागतं..


प्रेमात पडणे खुप सोपे असते,
पण जन्मभर प्रेम करून,
कोणत्याही परिस्थितीत साथ देणं,
म्हणजे खरं प्रेम..


खूप प्रेम करतो गं तुझ्यावर
म्हणून मला तुझ्या समोर झुकायला
कमीपणा नाही गं वाटत मला..


जर एखादी मुलगी,
तिच्या आई-बाबापेक्षा आणि स्वतःच्या
इज्जतीपेक्षा तुम्हाला जास्त किंमत देत असेल,
तर तिला कधीच धोका देऊ नका..


एखादी व्यक्ती तुमची
काळजी घेत असते..
ती त्याला गरज आहे म्हणून
नाही तर,
तुम्ही त्या व्यक्तीसाठी,
कोणीतरी खास असता,
म्हणून..


कसं सांगू तुला,
तूच समजून घे ना..
तुझी आठवण येते खूप,
जवळ येऊन मिठीत घे ना..


खुप मस्त आहे आमची जोडी..
किती पण वाद झाले तरी,
शेवटी एकत्र येतोच आम्ही…


माहिती आहे,
मी Perfect नाहीये..
पण आई शपथ,
मी तुझी पूर्ण life काळजी घेईल,
आणि चांगलं ठेवीन..


तू सोबत असलीस की,
मला माझाही आधार लागत नाही..
तू फक्त सोबत राहा,
मी दुसरं काहीच मागत नाही..


आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,
हा निर्णय तुझा आहे..
मरेपर्यंत तुझी साथ देणार,
हा शब्द माझा आहे..


जसं तू माझ्यावर मनापासून प्रेम करतेस,
तसं विश्वास सुद्धा ठेव..
मी स्वतःचा जीव देईल,
पण तुला कधीही सोडणार नाही..


विश्वास ठेव माझ्यावर,
तुला कधीच एकटं सोडणार नाही..
ज्या दिवशी एकटं सोडेल,
त्या दिवशी मीच या जगात असणार नाही..


जर एखाद्या मुलीवर,
True लव्ह असेल ना..
तर दुसरी कोणतीच मुलगी
तुम्हाला आवडणार नाही..


खूप सोपं असतं,
कुणावर तरी प्रेम करणं..
पण खूप अवघड असतं,
ती व्यक्ती आपली होणार नाही,
हे माहित असून सुद्धा,
तिच्यावरच प्रेम करणं..


मंगळसुत्र घालून तुला,
कुंकू लावेल तुझ्या माथी..
कितीही संकटे आली तरीही,
तुलाच करेल माझी जीवनसाथी..

Leave a Comment