Makar Sankranti Wishes Quotes Status & Messages Marathi

2 Min Read

सर्वप्रथम तुम्हाला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! या लेखात आम्ही तुमच्यासाठी मकरसंक्रांतीविषयी बरीच महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. मकरसंक्रांती हा हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात १३ किंवा १४ तारखेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया एकमेकांना शेतामध्ये आलेले वाण देतात. ऊस, हरभरा, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अश्या ५ वस्तू देवाला अर्पण केल्या जातात. तीळ आणि गुळाचे या दिवशी विशेष महत्व असल्याने एकमेकांना तिळगुळ वाटून संबंध चांगले ठेवण्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. ( तिळगुळ घ्या गोड गोड बोला )

Makar Sankranti Nimitt Hardik Shubhechha

Makar Sankranti Nimitt Hardik Shubhechha

Makar Sankrant Mangalmay Shubhechha

Makar Sankrant Mangalmay Shubhechha

Til Gul Ghya God God Bola

Til Gul Ghya God God Bola

Makar Sankrant Wishes Marathi

Makar Sankrant Wishes Marathi

Makar Sankrant Image Marathi

Makar Sankrant Image Marathi

Makar Sankrant Status Marathi

Makar Sankrant Status Marathi

Makar Sankrant Marathi Shubhechha

Makar Sankrant Marathi Shubhechha

Makar Sankrant Hardik Shubhechha

भोगीचा सण

या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, सूर्याच्या या संक्रमणामुळेच या दिवसाला मकर संक्रांति हे नाव पडले. संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी साजरी केली जाते. यादिवशी शेतातील सर्व उपलब्ध भाज्या तिळाच्या कुटाबरोबर एकत्र करून मिक्स भाजी केली जाते. बाजरीची भाकरी किंवा पुरणपोळी बनवली जाते. संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. हा काळ थंडीचा असल्यामुळे अंगात उष्णता येण्यासाठी तीळ आणि बाजरीची भाकरी खातात.

काळ्या रंगाचे महत्व

विवाहानंतर नवविवाहित वधूचे पहिले हळदी कुंकू हे संक्रांतीला करण्याची प्रथा आहे. या दिवशी तिला काळी साडी भेट दिली जाते, लहान मुले आणि पुरुष देखील काळे कपडे परिधान करतात. काळा रंग हा उष्णता ग्रहण करणारा आहे. हिवाळ्यातील थंडी संपण्याचा सर्वात शेवटचा दिवस असल्याकारणाने सर्वात थंड दिवस म्हणून काळे कपडे वापरले जातात. उत्तर भारतात या सणाला लोहरी तर तामिळनाडूमध्ये पोंगल नावाने संबोधले जाते. तिळाच्या स्निग्धतेप्रमाणे आणि गुळाच्या गोडीप्रमाणे एकमेकांचा स्नेह वृद्धिंगत व्हावा असा या सणाचा उद्देश आहे.

तिळगुळाचे महत्व

तिळगुळाची देवाण घेवाण करत नवीन संबंध जोडण्यासाठी, जुने संबंध आणखी समृद्ध करण्यासाठी आणि तुटलेले संबंध रागद्वेष विसरून पूर्ववत करण्यासाठी हा उत्तम दिवस आहे. म्हणून वर्षातील पहिला सण आनंदाने साजरा करत एकमेकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. आम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक अश्या संक्रांतीच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. आवडल्यास शेअर करायला विसरू नका.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *