Bayko Kavita Marathi | Bayko Sathi Marathi Kavita

आता कोणालाही नाही बघायचं..
आता कोणालाही नाही पहायचं..
कारण आज पासून ठरवलं मी..
पहिलं प्रेम फक्त बायकोवरच करायचं..

कोणी असो कितीही सुंदरी..
असो भले ही ती स्वर्गातली परी..
आपण मात्र तिला त्या नज़रेने नाही बघायचं..
कारण आज पासून ठरवलं मी..
पहिलं प्रेम फक्त बायकोवरच करायचं..

कोणी करेलही इशारा डोळ्याचा..
कोणी करेल जरी प्रयत्न बोलायचा..
आपण मात्र गप्प गप्पच बसायचं..
कारण आज पासून ठरवलं मी..
पहिलं प्रेम फक्त बायकोवरच करायचं..

कोणी करेल जरी स्वताहून तुमच्याशी बात..
कोणी करेल जरी समोर तुमच्या 1आपला हात..
आपण नुसतच हसून दूसरी कड़े बघायचं..
कारण आज पासून ठरवलं मी..
पहिलं प्रेम फक्त बायकोवरच करायचं..

बायको साठीचं हसायचं..
बायको साठीचं रडायचं..
बायको साठीचं जगायचं..
बायको साठीचं मरायचं..

कारण आज पासून ठरवलं मी..
पहिलं प्रेम फक्त बायकोवरच करायचं..

पावसावर मराठी कविता | Paus Kavita Marathi

Marathi Paus Kavita

ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट,
गारठलेल्या संध्याकाळी हिरवीचिंब पायवाट..
कोणी धावतांना धडपडतोय, कोणी कोणाला सावरतोय,
कोणी सखीचा हात धरताना मनातल्या मनात बावरतोय..
बरसणाऱ्या धारांमध्ये कोणी शोधतोय हरवलेले क्षण,
कोणी पावसात आसवे लपवून हलके करतोय आपले मन,
कोणा साठी गर्द गहिरा, कोणा साठी हिरवे रान,
पाऊस म्हणजे वेगळीच धंदी हरवून जाई मनाचे भान..
( Credit: Chitrakavita.com)


Paus Kavita Marathi

पाऊसाच्या थेंबांनी अंगावर शहारे आणले,
पुन्हा आठवणींच्या जगात मला नेऊन टाकले
आठवताच साऱ्या जुन्या आठवणी,
मन आलं पुन्हा माझं॑ भरुनी..
ठरवले आता नाही जगायचे भूतकाळाच्या जगात,
पण वर्तमान अडकून बसला अजूनही त्याच्या जाळ्यात..
आज आहे पाऊस नव्या आठवणींचा पुन्हा,
तरी डोळ्यात साठून बसला पाऊस मात्र जुनाच..
( Credit: Rakesh Shinde)


Tila Paus Avadto Kavita

तिला पाऊस आवडतो,
आणि मला पावसात ती..
तिला भिजायला आवडतं,
मला भिजतांना ती..
तिला बोलायला आवडतं,
आणि मला बोलतांना ती..


पाऊस कविता मराठी

काल पाऊस पडून गेला,
आणि तुझी आठवण सोडून गेला..
तुइया स्पर्शाची जाणीव करत,
तो थेंबांना ओंजळीत साठवून गेला..
पाऊस पडत होता बाहेर पण,
रात्रभर डोळ्यातून वाहून गेला..

अंगावर माइया ओघळणारा
तो थेंब मनाला स्पर्शून गेला..
भिजलेला तो क्षण आपला
माझ्या नसानसात भिनून गेला..
पाऊस पडत होता बाहेर पण
मनात माझ्या रुतून गेला..

बघ तो ढग ही माझ्या सारखा
तुझ्या प्रेमात पडून गेला..
तुझ्या विरहामध्ये तो वेडा
संपूर्ण रात्र रडून गेला..
पाऊस पडत होता बाहेर पण
मला आठवणींच्या लाटेत बुडवून गेला..

ओलीचिंब तुझी आठवण
पुन्हा जाणवून गेला..
विरहाचे धागे मनामध्ये
पुन्हा नव्याने बांधून गेला..
पाऊस पडत होता बाहेर पण
वेड जीवाला लावून गेला..

तू दिलेल्या जखमांना,
तो पुन्हा एकदा कोरून गेला..
खपल्या काडत तो जखमांना
पुन्हा उकरून गेला..
पाऊस पडत होता बाहेर पण
खोल जखम मनाला देऊन गेला..

( Credit: Rakesh Shinde)


Paus Sad Kavita

कोपलास का रे,
तू माझ्यावरती,
कट्टी नेहमी असते,
तुझी मराठवाड्यावरती..

रवी काका रागावून,
जाळी आमची धरती..
सांग वरून कधी
करशील प्रीत आम्हांवरती..

तुझी काळी आई
बघ हाक मारती,
शपथ तुला लेकरा
विसरू नको रे नाती..

लेक काळ्या मातीचा,
प्राण डोळ्यात आणती,
हट्ट सोड सख्या,
ये रे पाहुणचारासाठी..


Ye Re Ye Re Pavsa Kavita | येरे येरे पावसा कविता

येरे येरे पावसा, तुला देतो पैसा,
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा..
ये ग ये ग सरी, माझे मडके भरी,
सर आली धाउन,
मडके गेले वाहुन..!


Paus Poem in Marathi

चिंब भिजून पावसात
मन जाऊन बसतं ढगात
मोहरतात साऱ्या भावना
आठवणींच्या कृष्ण – धवल जगात

विजांसोबत सुरु होतो
मग ढगांचा लपंडाव
आठवणींनी पुन्हा गजबजतो
माझ्या मनातील उजाड गाव

कधी साकारते इंद्रधनु
उन्हासवे ओल्या पावसात
आठवणींना मग येतो बहर
रंगांनी सजल्या दिवसात

ओंजळीत गर्द अळवाच्या
चमकतात थेंब तेजाचे
आठवणींच्या धुंद धुक्याला
नवकोंदण तव प्रेमाचे

कधी संतत धार पावसाची
कधी साथ तीस वादळाची
कधी फुले बाग आठवांची
कधी वाहे सरिता आसवांची

सागराचा उग्र अवतार
सोबतीस पर्जन्य वारा
आठवांच्या रोखण्या ऊधाणा
तोकडा मनीचा किनारा

दररोज घडे श्रावणात
मेळ ऊन पावसाचा
सोबतीस माझ्या सदैव
हा खेळ संचिताचा..


Paus Sad Poem in Marathi

 

पाऊस प्रेम कविता

 

pahila paus kavita in marathi

पावसावरच्या मराठी कविता

वरील कवितांना जर चुकून कुणाला क्रेडिट देण्याचे राहिले असेल तर आम्हाला [email protected] या ई-मेल वर संपर्क साधावा. तुमच्याकडे हि अश्याच सुंदर पावसाच्या कविता असतील तर आम्हाला कंमेंटमध्ये लिहून पाठवा, आम्ही त्या या लेखात समाविष्ठ करू.

Aatmahatya Kavita – Do Not Suicide Poem in Marathi

This Poem is Against Suicide & will help you to change your mind from bad Suicide thoughts.
हि कविता तुम्हाला आत्महत्येच्या नकारात्मक विचारातून बाहेर पडायला मदत करेल. तुम्हाला प्रेरणा देईल कि सुसाईड करणे हा किती चुकीचा मार्ग आहे.

आत्महत्या केल्यानंतर खाली येऊन पाहिले मी
माझ्या घरचं एक दृश्य..

खूळ लागलं बापाला, स्वतः कानफटात मारून घेतोय
फोटोकडं बघून माझ्या, स्वतःलाच फार शिव्या देतोय..
केसं सोडून फिरते आई, वेडी झाली म्हणते गांव
ती कोण विचारलं की, माझंच सांगते म्हणे नाव..

बायकोकडे माझ्या बघवत नाही,
उदास आणि निस्तेज झाला चेहरा तीचा.
खळखळून हसणारा चेहरा तिचा पार गायब झाला होता..

तस कारण मोठं न्हवतं माझ्या त्या मरण्याचं,
मलाच न्हवतं भान तेंव्हा, असं काही करण्याचं..
रेल्वे खाली झोपलो, तुकडे झाले क्षणाला
घरचे म्हणतात गोळा करून आणलं तरी कुणाला..

पाहून हे सारं आज पुन्हा मी मरत आहे..

चिमुकली पिल्लं माझी हल्ली फार झुरत आहे,
ईकडून तिकडे घरभर पळतांना दिसत नाहीत..
आत्मा नुसता भरकटतोय परत येता ही येत नाही
त्या बापाची माफी घ्यायला, पुन्हा संधी ही देव देत नाही..

मी एकदाच मेलो पण घरचे रोज मरत आहेत,
माझ्या फोटो समोर बसून विनवण्या करत आहेत..
चुकला माझा निर्णय देवा माफी एकदा देशील का,
पुन्हा एकदा शरीर देऊन, माझ्या घरी मला नेशील का?

बापाला बिलगून रडावं म्हणतो आईच्या पायात पडावं म्हणतो,
आयुष्याला न घाबरता देवा पुन्हा एकदा लढावं म्हणतो..
देवा पुन्हा एकदा घडावं म्हणतो…!

आत्महत्येचा विचार करणार्यांने जरूर वाचावी अशी कविता….

Marathi Prem Kavita for Girlfriend

आवडतं मला तुझं डोळ्यातून बोलणं,
बोलताना एकटक माझ्याकडे पाहणं..
आवडतं मला तुझं ते गालात हसणं,
हसतांना खळीचं अचानक दिसणं…
आवडतं मला तुझं ते वायफळ बोलणं,
टाळीकरता स्वतःच हाथ पुढे करणं..
आवडतं मला तुझं ते खोटं रागवणं,
रागवल्याची सारखी जाणीव करून देणं…
आवडतं मला तुझं ते अलड वागणं,
प्रसंगी मात्र चेहऱ्यावर शहाणपण आणणं..
आवडतं मला सतत तुझ्यात गुंतणं,
गुंतताच स्वतःला हरवून बसणं…
आवडतेस तू आणि सारं तुझ्याशी जुळलेलं,
जे मात्र तुझ्या मनाला कधीच न कळलेलं…

Love Poem for Girlfriend in Marathi

Prem Kavita for Girlfriend in Marathi

Marathi Kavita on Love

आयुष्यभर कोणासाठी थांबणे,
म्हणजे प्रेम..
कुणीतरी असल्याचा आनंद,
म्हणजे प्रेम..
आठवण आली की ओठांवर आलेले हसू,
म्हणजे प्रेम..
त्या भावनांनी रात्रभर जागून राहणे,
म्हणजे प्रेम..
शेवट पर्यंत जे न विसरता येणारं,
म्हणजे प्रेम..
जीवापाड काळजी घेणारं,
म्हणजे प्रेम..
कुणासाठी रडणारं मन,
म्हणजे प्रेम..
आणि,
कुणाशिवाय तरी मरणं,
म्हणजे प्रेम…

Prem Kavita Marathi

Prem Mhanje Kavita