कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Happy Birthday Bayko
Wife Birthday Wishes
ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
LOVE YOU BAYKO!
पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
बायकोचा वाढदिवस शुभेच्छा
तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Bayko Cha Vadhdivas Shubhechha
माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी..
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ
व सर्वांची काळजी घेणाऱ्या..
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Birthday Status for Wife Marathi
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Wife Marathi
तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
I Love You So Much!
Tila Vadhdivsachya Shubheccha
तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
Marathi Birthday Status for Her
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Marathi Birthday Status for Girlfriend
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले..
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले..
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!
Happy Birthday Wife Images Marathi
माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY DEAR!
Baykola Wadhdiwasachya Shubhechha
माझ्या घराला घरपण आणणारी,
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
Happy Birthday Bayko Status
Get More – Wife Birthday Wishes in English
बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधताय?
अहो पण आधी बायकोला समजून तर घ्या…
बायको ला अर्धांगिनी हि म्हंटले आहे, कारण बायको हे पतीचे अर्धे अंग आहे कारण ती सर्व सोडून एका नवीन घरात येते तेव्हा त्या घरालाच आपले घर मानते, पतीची बहीण तिची बहीण, पतीच्या भावाला आपले भाऊ मानते आणि तिचे सासू सासरे म्हणजेच तिचे आई वडील.
अर्धांगिनी शब्दाची उत्पत्ती शिवाच्या अर्धनारेश्वर रूपातून झाली. प्रत्येक स्त्रीमध्ये अर्धा पुरुष आणि प्रत्येक पुरुषामध्ये अर्धी स्त्री लपलेली आहे. पत्नी पतीचे पतन होण्यापासून वाचवते म्हणून तिला पत्नी नाव दिले गेले आहे. तसेच संपूर्ण परिवाराचे भरन-पोषण करते म्हणून भार्या नाव दिले गेले आहे. अर्धांगिनी बनून पत्नी नेहमी परिवाराच्या संकटाशी लढत राहते, तर कधी परिवार खुश ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहते. पतीच्या सुखदुःखात नेहमी साथ देणारी अशी हि अर्धांगिनी सगळ्यांच्या आनंदासाठी आपला आनंद मात्र बाजूलाच ठेवते.
प्रत्येक पुरुषाला आपली पत्नी नेहमी त्रासदायक वाटते कारण ती नेहमी त्याला नको असलेल्या गोष्टी करण्यापासून रोखते. त्याच्या अधिकारात जगत नाही, त्याला घरकामात मदत करायला लावते, त्याला त्याच्या बिझी कामातून थोडा वेळ मागते, कारण तिलाही भावना असतात काही इच्छा असतात, तिलाही शारीरिक त्रास होतो. तिची स्वप्ने पूर्ण करण्याची अपेक्षा ती फक्त आपल्या पतीकडूनच करत असते. तिला हवा असतो तिला समजून घेणारा, तिच्या इच्छा पूर्ण करणारा, तिला वेळ देणारा असा एक सोबती कि ज्याच्याजवळ ती आपले दुःख व्यक्त करू शकते…
काही असो पण पत्नी हि घराचा पाया आहे, तिच्याशिवाय संसाराचा गाडा हलूच शकत नाही. परिवाराचा सांभाळ करणारी, घर स्वच्छ ठेवणारी, मुलांचा अभ्यास घेणारी, सकाळ संध्याकाळ परिवाराच्या नाश्त्याची जेवणाची सोय करणारी, सासू सासऱ्यांचा सांभाळ करणारी, काटकसर करणारी, पतीला व्यसनापासून रोखणारी, पाहुण्यांचा मानसन्मान करणारी अशी बरीच कामे ती पतीच्या सहभागाशिवाय निसंकोच पार पडत असते, अश्या पत्नीला तिच्या हक्काचा एक दिवस द्यावा असे नाही वाटत का?
पत्नीवर प्रेम करत असाल आणि तिला समजून घेत असाल तर तिला तिच्या वाढदिवसाला एक दिवस मोकळेपणा द्या, तिला तिच्या हक्काचा दिवस आनंदाने जगू द्या. ती करणारी सर्व कामे तुम्ही करा, तिच्या त्रासाची कल्पना येईल आणि तिच्याबद्दल अभिमानही वाटेल. आणि हो एक छोटासा गुलाब देऊन आपल्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका..
आम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे पत्नीसाठी वाढदिवसाचे संदेश पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. कोणी पत्नीला लाडाने बायको म्हणतो तर कोणी शोना, कोणी Wife, My Love तर कोणी Darling, Sweetheart.. काहीहि असो पण जेवढ्या लाडाने नाव घेताय तेवढेच प्रेम हि करा… अगदी शेवटपर्यंत…