Birthday Wishes in Marathi Words

आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो, पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत… काही नाती क्षणांची असतात काही नाती व्यवहाराची असतात, पण त्यातही कधी-कधी असं एखाद नातं आपण जोडतो, जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतं !! असंच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!

Birthday Wishes in Marathi for Best Friend

विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली. तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता, नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन, आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या मैत्रीचा पाया. सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी अविरत उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी. यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी… वाढदिवसाच्या शुभकामना!

Wadhdiwasachya Hardik Shubhechha

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

Wadhdiwasachya Shubhechha in Marathi

तुमच्याशी असणारं आमचं नातं.. आता इतकं दृढ झालंय की आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती नकळतपणे तुमच्यासारखीच वाटत राहते ! तूमचं आमच्या सोबतचं वागणं, बोलणं… आमच्यात तुम्ही ज्या पद्धतीने मिसळता खेळता बागडता… वाटतं, तुमचा सहवास कधी संपूच नये वाटतं, तुमची साथ कधी सरूच नये… सतत, सतत तुमचं मार्गदर्शन लाभत रहावं सतत, सतत तुमचा स्नेह मिळत राहावा या … Read more