नियती म्हणजे केवळ योगायोग नाही,
ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते..
बुद्धीमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य पर्याय निवडतो.
सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव दु:ख आणि कष्ट भोगत असतो.
असे लोक जीवनात काहीही करू शकत नाहीत…
Category: CHANAKYA NITI Marathi
Niyati Ani Nashib
Jhalelya Goshtivishayi Chinta Karu Naka
जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून,
चिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही.
झालेल्या गोष्टींविषयी चिंता करून काहीही लाभ नाही..
भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल,
त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे.
आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत
यासाठी दक्ष राहिले पाहिजे…
Jhalelya Goshitibaddal Dukhi Hou Naka
ज्या गोष्टी घडून गेल्या तो भूतकाळ झाला.
भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा येत नसतात.
गेलेला काळ चांगला होता की वाईट?
गेलेला काळ गेला, तो आता बदलता येणे शक्य नाही.
त्यामुळे झालेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप करून दु:खी होऊ नका…