Bhutkalat Je Ghadle Tyamule Dukhi Hovu Naka
भूतकाळात जे घडले त्यामुळे दु:खी होऊ नका. चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमानकाळाचा सदुपयोग, भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे…
भूतकाळात जे घडले त्यामुळे दु:खी होऊ नका. चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमानकाळाचा सदुपयोग, भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे…
जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून, चिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही. झालेल्या गोष्टींविषयी चिंता करून काहीही लाभ नाही.. भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल, त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे. आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत यासाठी दक्ष राहिले पाहिजे…
ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा, जास्त साधा-सरळ, आणि सहज असतो, त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो… धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा लोकांना दुर्बल समजले जाते. अनावश्यक स्वरुपात या लोकांना प्रताडना सहन करावी लागते.
ज्या व्यक्तीला पैशाचा हव्यास आहे त्याला पैसा देवून, अहंकारी व्यक्तीला हाथ जोडून, मुर्खाची गोष्ट मान्य करून अणि विद्वानाला सत्य बोलून वश करता येऊ शकते…