Category: BAIL-POLA Status Marathi

Bail Pola Status Wishes Marathi | बैल पोळा शुभेच्छा

आज बैलांचा सण बैलपोळा. वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचा मित्र आज नांगराला जुंपला जात नाही. आज विश्रांती घेण्याचा त्याच्या हक्काचा दिवस. श्रावण महिन्यात पिठोरी अमावसायला हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. आज शेतकरी त्याची नदीवर किव्हा ओढ्यावर नेवून आंघोळ घालतो, मग त्याला चरायला नेले जाते. मग घरी आणून प्रत्येक बळीराजा आपल्या ऐपतीप्रमाणे त्याची साजशृंगार सजावट करून त्याला पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य देऊन त्याचे पूजन करतो.
ढोल ताशा सनई वाजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एकमेव सण शेतकरी बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तुम्ही जर बैल पोळा स्टेटस शोधात असाल तर आम्ही खाली संग्रहित केलेल्या बैल पोळ्याच्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील. शेतकरी शेतात राबतो आपल्यासाठी अन्न पिकवतो म्हणून आपल्या दोन वेळेच्या जेवणाची सोय होते. तुमच्या शेतकरी मित्राला पोळ्याच्या शुभेच्छा देऊन त्याचे आभार मानायला आज विसरू नका.

Bail Pola Shubhechha Status

Bail Pola Family Wishes

Bail Pola Hardik Shubhechha

Polyachya Hardik Shubhechha

Bail Pola Background

Bail Pola Background Banner

Bail Pola Shubhechha Banner

Bail Pola Shubhechha Banner 1

Bail Pola Shubhechha Banner 2

Bail Pola

Bail Pola Hardik Shubhechha Image

Bail Pola Wishes Marathi

Bail Pola Status

नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही…
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

बैल पोळाच्या शुभेच्छा

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…