500+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Marathi suvichar.

Best Marathi Suvichar / मराठी सुविचार

Marathi suvichar :- सुविचार म्हणजे प्रेरणादायी विचार जे आपल्याला सर्वात जास्त प्रेरित करतात. सुविचार निराशावादी ते आशावादी बनविण्यात मदत करू शकतात. जर तुमच्या हृदयात सुविचार असेल तर तुम्हाला प्रत्येक परिस्थिती किंवा समस्यांची वेगळी बाजू दिसू शकते. प्रत्येक परिस्थिती, समस्या किंवा माणसाच्या दोन वेगवेगळ्या बाजू असतात, आपण प्रत्यक्षात काय पाहतो हे आपल्यावर अवलंबून आहे.त्यामुळे आयुष्यात सुविचारांचे वाचन फार आवश्यक आहे.

आजच्या पोस्टमध्ये मराठी सुविचार, Best Marathi Suvichar , Suvichar In Marathi, Suvichar Status Marathi, Marathi Suvichar, Marathi Suvichar On Life इत्यादी collection आहेत.

बेस्ट मराठी सुविचार / Best Marathi Suvichar

marathi suvichar

समुद्रात कितीही मोठे
वादळ आले तरी
समुद्र आपली शांतता
कधीही सोडत नाही.

विश्वास हा खोडरबर सारखा
असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर
तो कमी होत जातो.

‘स्वतचा अहंकार चेपणे व
दुसऱ्याच अहंकार जपणे’
ही आहे सुखी व यशस्वी
जीवनाची गुरूकिल्ली.’

गरूडा इतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे
सोडत नाही.

‘हृदयातील देव अंतकरणात
कसा धरून ठेवायचा’ हे
शिकवितात ते सद्गुरू.

हेतू, परिणाम आणि स्वरूप
ही तिन्ही पाहून कर्माची
योग्यता ठरवावी.

हिंसा हे जगातलं सगळ्यात
मोठं पाप आहे, मग ती एखाद्या
माणसाची असो वा पशुची !

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे
हे महापाप !

कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

भरलेला खिसा माणसाला दुनिया
दाखवतो, रिकामा खिसा मात्र
दुनियेतील माणसं दाखवतो.

मराठी सुविचार

मराठी सुविचार

हसण्याशिवाय गेलेला दिवस
व्यर्थ समजावा.

हसण्याचं मोल काय आहे
हे रडल्यावरच कळतं.

प्रसिध्दी ही अशी बाब आहे
जी कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.

हळवेपणा बाजूला ठेवा
वास्तवाला जाण्याची तयारी ठेवा.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

हजार गुण प्राप्त करणे सोपे
आहे पण एक दोष दूर करणे
फार कठीण आहे.

हक्कासाठी झगडण्यापेक्षा
कतर्व्याशी
प्रामाणिक राहा.

हक्क आणि कर्तव्य या एकाच
नाण्याच्या दोन बाजू आहेत.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

स्वातंत्र्य हा सर्वांचा कधीही नष्ट
न होणारा जन्मसिध्द हक्क आहे.

बेस्ट मराठी सुविचार

Suvichar marathi

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर
पडतात स्वप्न ती असतात जी
तुम्हांला झोपू देत नाहीत.

स्वतःची चूक स्वतःला कळली
की बरेच अनर्थ टळतात.

स्वतःची चिंता न करता जो
दुसर्‍याची चिंता करतो तोच
खरा संन्याशी.

थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.

स्वतःचा विकास करा.
ध्यानात ठेवा, गती आणि वाढ
हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत

स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक
म्हणजे सर्वात महत्वाची गुंतवणुक

स्तुतीने चांगली माणसे सुधारतात,
तर वाईट माणसे बिघडतात .

सौंदर्य हे वस्तूत नसते;
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

Suvichar In Marathi

Suvichar in marathi

सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे
अधिक चागंले.

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच
घटनांचा शेवट अवलंबून असतो.

सुधारणा ही बाहेरुन लादता येत नाही,
तिचा उगम आतूनच पाहिजे.

सुधारणा करण्याचे अनेक
मार्ग असतात.

सुखाला सोबत लागते,
पण दु:खाला एकटे पणानेच
जगावे लागते.

सामर्थ्य हे जिंकण्यातून मिळत
नसते ते संघर्षातून निर्माण होत असते

साधेपणात फार मोठे
सौंदर्य असते.

सहानभूती, गोड शब्द,
ममतेची दुष्टी यांनी जे काम
होते ते पैशाने कधी होत नाही.

सर्वात अधिक संकटे घेऊन
येणारा क्षण आपल्याबरोबर
येणार्‍या संकटासोबत विजयश्रीही
घेऊन येतो.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत;
काही सोडून दिले की
आपोआप सुटतात.

सुविचार इन मराठी

Suvichar status marathi

सर्व कलांमध्ये
`जीवन जगण्याची कला’
हीच श्रेष्ठ कला आहे

समोर अंधार असला तरी
त्या पलीकडे उजेड आहे
हे लक्षात ठेवा.

समुद्रातील तुफ़ानापेक्षा मनातील
वादळे अधिक भयानक असतात.
ती निर्माण होऊ देऊ नका.

समुद्राचा तळ शोधल्याशिवाय
मोती मिळत नाहीत.

समाधानी राहण्यातच आयुष्यातील
सर्वात मोठ सुख आहे

समाधान म्हणजे अंत:करणाची
संपत्ती आहे ज्याला हि संपत्ती
सापडते तो खरा सुखी माणूस आहे

समाजाचा विकास केवळ
सत्तेने होत नाही तो आदर्श
शिक्षाकांमुळे होतो.

समाज म्हणजे लोकांचा
जमाव नव्हे, एकी होय .

समता, स्वातंत्र्य, सहानुभूती
यानेच व्यक्तीचा विकास होतो.

सदाचार हा मनुष्याचा
खरा अलंकार आहे.

Suvichar Status Marathi

सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा
व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.

नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.

संकटं टाळणं माणसाच्या
हाती नसतं पण संकटाचा
सामना करणं त्याच्या हातात असतं.

खूप माणसांची स्वप्ने या एका
विचारामुळे अपूर्ण राहतात तो
म्हणजे “लोक काय म्हणतील?

अडचणीत असतांना अडचणीपासून
दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या
अडचणीत जाण्यासारखेच आहे.

थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला
सुख मिळत असेल तर आपण
थोडे दुःख सहन करायला काय
हरकत आहे.

जीवनात चांगला माणूस
होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.

कारण सांगणारी लोक यशस्वी
होत नाही.. आणि यशस्वी
होणारे लोक कारण सांगत नाही.

माणसाचं छोट दु:ख जगाच्या
मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते.

सुविचार स्टेटस मराठी

जर तुम्हाला तुमची श्रीमंती
मोजायची असेल तर नोटा मोजू
नका कधी चुकून डोळ्यांत दोन
अश्रू आले तर ते पुसायला किती
जन येतात ते मोजा.

न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी
कधी नशीब सुध्दा हरत.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर
जळते त्याचा तिरस्कार कधीच
करू नका. कारण ती व्यक्ती
स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट
व्यक्ती समजून जळत असते.

जीवनात त्रास त्यांनाच होतो जे
सतत जबाबदारी स्वीकारतात
आणि जबाबदारी स्वीकारणारे
कधीच हरत नाही एकतर ते
जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत
नाही हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची
इच्छा हि अपयशी होण्याच्या
भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.

माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी
माणस हवीत कारण, ओळख ही
क्षणभरासाठी असते तर
जपवणूक आयुष्यभरासाठी.

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष
स्वीकारण्यात आहे कारण एकही
दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत
बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान
भागविणे जास्त श्रेष्ठ.

Marathi Suvichar

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी
येईल सांगता येत नाही.

मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या
धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.

डोक शांत असेल तर निर्णय
चुकत नाही, भाषा गोड असेल
तर माणसं तुटत नाहीत.

विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार
केलाच पाहिजे.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला
येणे असे नसते, एखादी गोष्ट
पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे
म्हणजेच जिंकणे होय.

आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

कावळ्याच्या मरणाचे वाईट
वाटत नाही; मात्र मोर मेला
तर आपण हळहळतो.
कारण सौंदर्य नष्ट होते.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण
कोणत्यातरी एका क्षेत्रात
सतत उगळावा लगतो.

जीवनावर मराठी सुविचार

कोणी कौतुक करो वा टीका
लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधारण्याची संधी.

आपण पक्षाप्रमाणे आकाशात
उडायला शिकलो, माशाप्रमाणे,
समुद्रात पोहायला शिकलो पण
जमिनीवर माणसासारखे
वागायला शिकलो का?

परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत
डोकावून पाहण्याची संधी !

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा
मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

कोणाच्याही सावलीखाली उभा
राहिल्यावर स्वतःची सावली कधीच
निर्माण होत नाही. स्वतःची
सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे
स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन
स्वतंत्र नाही तो मोकळा
असूनही गुलाम आहे.

भुतकाळ आपल्याला आठवणींचा
आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला
स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा
आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा
अपमान करता आहात.

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण
करतो तोच खरा माणूस !

Marathi Suvichar On Life

ज्याने स्वत:चं मन जिंकलं
त्याने जग जिंकलं.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून
देऊ शकतो, पण त्यातून
यशाच्या दिशेने जाण्यासाठी
स्वतःलाच चालावे लागते.

प्रत्येकाच्या मनात एक आदर्श
व्यक्ती असलीच पाहिजे.

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे
सामर्थ निर्माण करतो त्यामुळे
विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

कधी कधी देव तुमची परिस्थिती
बदलत नाही कारण त्याला तुमची
मनस्थिती बदलायची असते.

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच
घटनांचा शेवट अवलंबून असतो.

मनावर काबू ठेवणे म्हणजे
मनुष्याचा विकास आणि मनुष्यावर
मनाचे वर्चस्व असणे म्हणजे विनाश होय.

जीवनात जोखीम घेण्यास
कधीही घाबरू नका
जर तुम्ही जिंकलात किंवा हरलात
तर तुम्ही शिकाल.

संपूर्ण जगात देवानी
फक्त माणसामध्ये हसण्याची गुण दिले आहे
ही गुणवत्ता गमावू नका.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide मराठी सुविचार, Best Marathi Suvichar , Suvichar In Marathi, Suvichar Status Marathi, Marathi Suvichar, Marathi Suvichar On Life etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…