Navra Bayko Jokes Marathi | नवरा बायको जोक्स

Navra Bayko Jokes शोधताय? आम्ही निवडलेले खास नवरा बायको जोक्स तुमच्या नवऱ्याला किव्हा बायकोला नक्की आवडतील. इमेज वर क्लिक करून डाउनलोड करा आणि तुमच्या नवऱ्याला किव्हा बायकोला शेअर करा..

Navra Bayko Raktdaan Joke


नवरा: कुठे गेली होतीस?
बायको: रक्तदान करायला..
नवरा: हे बरोबर नाही.. माझं प्यायचं
आणि बाहेर जाऊन विकायचं..

Navra Bayko Maitrin Joke


बायको: माझी मैत्रीण येणार आहे,
दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा..
नवरा: बरं.. पण वचन दे,
माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील…!
☺☺☺

Navra Bayko Bahin Joke


बायको: काय हो.. इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा: बहिणीशी!
बायको: अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?
नवरा: अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…!

Navra Bayko Bhandan Joke


नवरा बायकोचे भांडण चालू होते,
नवरा: तू कुत्री..
बायको: तू कुत्रा..
तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणतो,
” हे हे हे,
मी पिल्लू ”

Bayko Mi Garodar Ahe


बायको: अहो एक सांगू का,
पण मारणार तर नाही ना?
नवरा: हो सांग ना,
बायको: मी गरोदर आहे,
नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे,
मग तू एवढी घाबरतेस का?
बायको: कॉलेजला असतांना ही बातमी बाबांना सांगितली होती,
तेव्हा त्यांनी मारलं होतं…!

Navra Bayko Sukhi Sansar


बायकांनी नवऱ्याला मुठीत ठेवण्यापेक्षा
मिठीत ठेवण्याचा जास्त प्रयत्न केला तर
संसार पण जास्त सुखाचा होईल..

I Love You Peksha Asardar Shabd


लग्नानंतर बायकोवर प्रेम आहे दाखवण्यासाठी
I Love You पेक्षा असरदार शब्द आहे,
आज मी भांडी घासतो दे,
तू तोपर्यंत Whatsapp बघ..

Baykola Sudhraychi Soppi Idea


बायकोला सुधारायची सर्वात सोप्पी आयडिया…
.
.
लागले लगेच वाचायला..
कामं करा..!
बायको सुधरत नसते..

Navra Bayko Ani Sali Joke

Navra Bayko Aani Sali joke
नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे,
बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न.
मला कशाला गटवलीत?
नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा…

Navra Bayko Funny Status

Navra Bayko Funny Status
बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे..

नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..

लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा..
☺☺☺

Navra Bayko Joke Marathi

Navra Bayko Joke Marathi
बायको: माझ्या आईचं ऐकलं असतं आणि
तुम्हाला नकार दिला असता ना, तर मी सुखी झाले असते..
नवरा: काय सांगतेस! तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको: हो..
नवरा: अरे देवा.. आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो…
☺☺☺

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.