आज नवरात्री! आपणास नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..! तुम्ही नवरात्रीच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुम्हाला इथे वाचायला मिळेल नवरात्रीची माहिती तसेच निवडक असे नवरात्री शुभेच्छा संदेश. Get 50+ Best Navratrichya Shubhechha & Navratri Wishes Marathi to send your friends & family. We have added some selected Navratri Status & Quotes in Marathi for You. We hope you will enjoy this & comment about this page.
अंबा मातेची नऊ रुपं तुम्हाला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो !
या वर्षी चैत्र नवरात्रीचा आरंभ दिनांक ७ ऑक्टोबर पासून होत आहे. हिंदू धर्मा मध्ये नवरात्रीचे खूप महत्व आहे. या काळात मातेचे भक्त मातेला प्रसन्न करण्यासाठी ९ दिवसांचा उपवास करतात. कलश स्थापन करून आणि दीप लावून नऊ दिवस देवीची पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किव्हा नवरात्री. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप लावणे, दररोज झेंडूच्या फुलांच्या माळा सजवून सकाळ संध्याकाळ देवीची आरती करणे अशा प्रकारे नवरात्री व्रत केले जाते.
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते..
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..!
नवरात्रीत जोगवा मागणे हा देखील देवीच्या उपासनेचाच एक प्रकार आहे. परडीमध्ये देवीची मूर्ती ठेवून मंगळवारी किव्हा शुक्रवारी किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किव्हा पीठ मागणे याला जोगवा म्हणतात. यामागे आपला अहंकार कमी व्हावा असा समज आहे.
नवरात्रीत साड्यांचे रंग हि एक नवी संकल्पना २००४ साली रुजू झाली. त्याचीहि एक गम्मत आहे. मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नऊ दिवस विविध रंगांच्या साड्या नेसवल्या गेल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्स ने प्रसिद्ध केले आणि महाराष्ट्रातील महिलांनी त्याच रंगांच्या साड्या नेसून त्याला भरभरून प्रतिसाद दिला. हीच पद्धत दरवर्षी इतर राज्यातील महिलांनी हि साकारली आणि दरवर्षी असे घडत गेले.
आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा..
शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना!
*||अंबे माता की जय||*
भारतीय ज्योतिष्यानी नऊ दिवस येणाऱ्या वारानुसार प्रत्येक दिवसाचे रंग ठरवले आहेत त्यानुसार देवीला त्या त्या दिवशी विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. रंगांची हि कल्पना एकोणिसाव्या शतकात पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती. सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवार चा रंग केशरी, चंद्राचा रंग पांढरा म्हणून सोमवार चा रंग पांढरा, मंगळ ग्रह लाल म्हणून मंगळवार चा रंग लाल, बुधवारचा रंग निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा रंग हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रीचे शेवटचे दोन दिवसासाठी मोरपिशी, हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवलेले आहेत.
२०२१ मधील नवरात्रीचे ९ कलर्स हे आहेत:
- पिवळा = 07/10/2021 गुरूवार
- हिरवा = 08/10/2021 शुक्रवार
- राखाडी = 09/10/2021 शनिवार
- नारंगी = 10/10/2021 रविवार
- पांढरा = 11/10/2021 सोमवार
- लाल = 12/10/2021 मंगळवार
- निळा = 13/10/2021 बुधवार
- गुलाबी = 14/10/2021 गुरूवार
- जांभळा = 15/10/2021 शुक्रवार
दहावा दिवस म्हणजे दसरा नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि दुर्गा विसर्जनाचा दिवस. या दिवशी देवीने पृथ्वीवर येऊन लोकांना त्रास देणाऱ्या महिषासूर राक्षसाचा वध करून ठार मारून त्याच्यावर विजय मिळवला म्हणून विजयादशमी असेही नाव पडले. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनानंतर सोने म्हणजेच आपट्याची पाने वाटून ह्या गोष्टीचा आनंद व्यक्त केला जातो.
नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो..
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो..
हीच देवीला प्रार्थना..
शुभ नवरात्री!
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
गुजरात मध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवस रात्री गरबा खेळला जातो. गरबा म्हणजे गोल रिंगण करून टाळ्यांच्या आवाजात देवीच्या गाण्यांवर नृत्य करणे आणि देवीला जागृत करणे. दांडिया किव्हा दांडिया रास म्हणजे लाकडी दांड्यांच्या गजरात गोलाकार रिंगण करून देवीची भक्तिपूर्ण गाणी म्हणणे. लेख आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करायला आणि पोस्ट वर कंमेंट करायला विसरू नका. धन्यवाद!