नवीन बाळाचे आगमन म्हणजे घरात जणू काही दिवाळीच असते, नवीन पाहुण्याच्या आगमनाने घर अगदी प्रफुल्लित होऊन जाते, प्रत्येक नात्याला एक नवेपण येते, कोणी काका, कोणी मामा, कोणी आजी तर कोणी आजोबा… भावाला बहीण मिळते किव्हा बहिणाला भाऊ मिळतो..
बाळ जन्माच्या शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागतो. आई आणि बाबा मनोमन सुखावतात, स्वतःला धन्य मानतात..
नवजात बाळाला शुभेच्छा देण्यासाठी जर तुम्ही काही शुभेच्छा संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खास आणि निवडक असे कन्यारत्न शुभेच्छा आणि पुत्ररत्न शुभेच्छा संदेश.
नवजात बालकाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाहुणे मंडळी बाळ जन्मास येण्याआधीपासूनच तयार असतात. इंटनेटवर आणि विविध सोशल मीडिया वर नवजात बाळाच्या शुभेच्छा शोधल्या जातात. तुम्ही जर मुलगा झाला शुभेच्छा किव्हा मुलगी झाली शुभेच्छा हा कीवर्ड गूगल वर सर्च केला तर तुम्हाला आमची वेबसाईट भेटू शकते.
मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा देणे हे तितकेच महत्वाचे आहे कि आपण किती उत्सुक आहोत नवजात बालकाच्या आईबाबांना भेटण्यासाठी, बाळ पाहण्यासाठी आणि बाळाचे तोंडभरून कौतुक करण्यासाठी..
मुलगी झाली म्हणजे लक्ष्मी आली असे म्हणतात तेही तितकेच खरे कारण एक स्त्रीच घराचा आणि कुटुंबाचा विकास करू शकते, दया, माया आणि ममता हि तिची आभूषणे.. मुलगा जेवढा आईवडिलांना सांभाळू शकत नाही तेवढी मुलगी सांभाळते, येथे तुम्हाला मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा हि सापडतील, इमेज वर क्लिक करून डाउनलोड करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका.. धन्यवाद!
Here you will get New Born Baby Congratulations in Marathi & New Born Baby Wishes in Marathi to share with your loved ones.
कन्यारत्न शुभेच्छा
पुत्ररत्न शुभेच्छा
आगमन नव्या बाळाचे अभिनंदन आई-बाबांचे..
बाळास अनेक आशीर्वाद व शुभेच्छा!
New Baby Shubhechha in Marathi
आजवरचे घर नुसते घर होते..
बाळाच्या येण्याने ते
‘गोकुळ’ होऊन गेले..
तुमच्या कुटुंबात देवाने पाठवलेल्या अमूल्य भेटीबद्दल
तुमचे हार्दिक अभिनंदन!
मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा
पहिली बेटी धनाची पेटी.
धनसंपन्न आई-वडिलांचे अभिनंदन.
बाळास शुभाशीर्वाद !
Kanyaratna Wishes Banner Marathi
तुमच्या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
Putraratna Wishes Banner Marathi
तुमच्या दोघांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
नवजात बालकास आशीर्वाद व शुभेच्छा !
बाळाच्या आगमनाची
गोड बातमी कानी आली..
तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन !
New Born Baby Wishes to Parents in Marathi
‘आई बाबा’ झाल्याबद्दल,
तुमच्या दोघांचे हार्दिक अभिनंदन..!!