पावसावर मराठी कविता | Paus Kavita Marathi

Marathi Paus Kavita

ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट,
गारठलेल्या संध्याकाळी हिरवीचिंब पायवाट..
कोणी धावतांना धडपडतोय, कोणी कोणाला सावरतोय,
कोणी सखीचा हात धरताना मनातल्या मनात बावरतोय..
बरसणाऱ्या धारांमध्ये कोणी शोधतोय हरवलेले क्षण,
कोणी पावसात आसवे लपवून हलके करतोय आपले मन,
कोणा साठी गर्द गहिरा, कोणा साठी हिरवे रान,
पाऊस म्हणजे वेगळीच धंदी हरवून जाई मनाचे भान..
( Credit: Chitrakavita.com)


Paus Kavita Marathi

पाऊसाच्या थेंबांनी अंगावर शहारे आणले,
पुन्हा आठवणींच्या जगात मला नेऊन टाकले
आठवताच साऱ्या जुन्या आठवणी,
मन आलं पुन्हा माझं॑ भरुनी..
ठरवले आता नाही जगायचे भूतकाळाच्या जगात,
पण वर्तमान अडकून बसला अजूनही त्याच्या जाळ्यात..
आज आहे पाऊस नव्या आठवणींचा पुन्हा,
तरी डोळ्यात साठून बसला पाऊस मात्र जुनाच..
( Credit: Rakesh Shinde)


Tila Paus Avadto Kavita

तिला पाऊस आवडतो,
आणि मला पावसात ती..
तिला भिजायला आवडतं,
मला भिजतांना ती..
तिला बोलायला आवडतं,
आणि मला बोलतांना ती..


पाऊस कविता मराठी

काल पाऊस पडून गेला,
आणि तुझी आठवण सोडून गेला..
तुइया स्पर्शाची जाणीव करत,
तो थेंबांना ओंजळीत साठवून गेला..
पाऊस पडत होता बाहेर पण,
रात्रभर डोळ्यातून वाहून गेला..

अंगावर माइया ओघळणारा
तो थेंब मनाला स्पर्शून गेला..
भिजलेला तो क्षण आपला
माझ्या नसानसात भिनून गेला..
पाऊस पडत होता बाहेर पण
मनात माझ्या रुतून गेला..

बघ तो ढग ही माझ्या सारखा
तुझ्या प्रेमात पडून गेला..
तुझ्या विरहामध्ये तो वेडा
संपूर्ण रात्र रडून गेला..
पाऊस पडत होता बाहेर पण
मला आठवणींच्या लाटेत बुडवून गेला..

ओलीचिंब तुझी आठवण
पुन्हा जाणवून गेला..
विरहाचे धागे मनामध्ये
पुन्हा नव्याने बांधून गेला..
पाऊस पडत होता बाहेर पण
वेड जीवाला लावून गेला..

तू दिलेल्या जखमांना,
तो पुन्हा एकदा कोरून गेला..
खपल्या काडत तो जखमांना
पुन्हा उकरून गेला..
पाऊस पडत होता बाहेर पण
खोल जखम मनाला देऊन गेला..

( Credit: Rakesh Shinde)


Paus Sad Kavita

कोपलास का रे,
तू माझ्यावरती,
कट्टी नेहमी असते,
तुझी मराठवाड्यावरती..

रवी काका रागावून,
जाळी आमची धरती..
सांग वरून कधी
करशील प्रीत आम्हांवरती..

तुझी काळी आई
बघ हाक मारती,
शपथ तुला लेकरा
विसरू नको रे नाती..

लेक काळ्या मातीचा,
प्राण डोळ्यात आणती,
हट्ट सोड सख्या,
ये रे पाहुणचारासाठी..


Ye Re Ye Re Pavsa Kavita | येरे येरे पावसा कविता

येरे येरे पावसा, तुला देतो पैसा,
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा..
ये ग ये ग सरी, माझे मडके भरी,
सर आली धाउन,
मडके गेले वाहुन..!


Paus Poem in Marathi

चिंब भिजून पावसात
मन जाऊन बसतं ढगात
मोहरतात साऱ्या भावना
आठवणींच्या कृष्ण – धवल जगात

विजांसोबत सुरु होतो
मग ढगांचा लपंडाव
आठवणींनी पुन्हा गजबजतो
माझ्या मनातील उजाड गाव

कधी साकारते इंद्रधनु
उन्हासवे ओल्या पावसात
आठवणींना मग येतो बहर
रंगांनी सजल्या दिवसात

ओंजळीत गर्द अळवाच्या
चमकतात थेंब तेजाचे
आठवणींच्या धुंद धुक्याला
नवकोंदण तव प्रेमाचे

कधी संतत धार पावसाची
कधी साथ तीस वादळाची
कधी फुले बाग आठवांची
कधी वाहे सरिता आसवांची

सागराचा उग्र अवतार
सोबतीस पर्जन्य वारा
आठवांच्या रोखण्या ऊधाणा
तोकडा मनीचा किनारा

दररोज घडे श्रावणात
मेळ ऊन पावसाचा
सोबतीस माझ्या सदैव
हा खेळ संचिताचा..


Paus Sad Poem in Marathi

 

पाऊस प्रेम कविता

 

pahila paus kavita in marathi

पावसावरच्या मराठी कविता

वरील कवितांना जर चुकून कुणाला क्रेडिट देण्याचे राहिले असेल तर आम्हाला [email protected] या ई-मेल वर संपर्क साधावा. तुमच्याकडे हि अश्याच सुंदर पावसाच्या कविता असतील तर आम्हाला कंमेंटमध्ये लिहून पाठवा, आम्ही त्या या लेखात समाविष्ठ करू.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.