Seva Nivrutti Retirement Shubhechha Wishes Marathi

6 Min Read

Are you searching for Retirement Wishes in Marathi? You are on the correct page. Here you can read Marathi Retirement Wishes for your Friend, Boss, Brother, or Colleagues.

It is a great pleasure for anyone to retire from their job. Even though we cannot all meet each other every day, we can live our lives as we wish to come. no tension to getting up early every day, no tension of catching the bus, no listening to the boss’s firing, no need to come home late. Guys, in this post we have brought you some selected retirement Special Wishes in Marathi & I hope you will like them very much.

हा फोटो बॅनर एडिट करा

आपण मराठीमध्ये रिटायरमेंट शुभेच्छा शोधत आहात का? आपण योग्य पृष्ठावर आहात. येथे आपण आपल्या मित्र, बॉस, भाऊ किंवा सहकारी यांच्यासाठी मराठी सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा वाचू शकता.

नोकरीवरून निवृत्त होण्यास कोणालाही खूप आनंद होतो. जरी आपण सर्वजण दररोज एकमेकांना भेटू शकत नाही याचे जरी दुःख असले, तरी आपण येणाऱ्या काळात आपल्या इच्छेप्रमाणे आपले जीवन जगू शकतो याचा हि आनंद होतो.. दररोज लवकर उठण्याचा ताण नाही, बस पकडण्याचे टेन्शन नाही, बॉसचा गोळीबार नाही, उशिरा घरी येण्याची गरज नाही. मित्रांनो, या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही निवडक सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठीत घेऊन आलो आहोत आणि मला आशा आहे की तुम्हाला त्या खूप आवडतील.

Retirement Wishes Marathi for Boss, Brother, Friends & Colleagues

आपण सेवानिवृत्त होताय,
आमचा निरोप घेताय हे अगदी खरं!
पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र,
सदैव अबाधितच राहील!
तुमच्या सहवासात घालवलेले
अनेक क्षण आजही आम्हाला आठवतात..
तुमचा स्वभाव, तुमचं वागणं,
आम्हाला सतत आठवतच राहील..
तुमचं इथून पुढचं आयुष्यही असंच
सुखसमाधानाचं जावो हि प्रार्थना..!


आज आपण जरी निवृत्त होत असलात,
तरी तुमची शिकवण आणि उत्साह
आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करेल..


Retirement म्हणजे Freedom.
मला आशा आहे की यापूर्वी आपल्याकडे वेळ नसलेल्या गोष्टी करण्याचा आपण आनंद घ्याल..
आपण फक्त कामातून निवृत्त होत आहात जीवनातून नाही.


Retirement म्हणजे जेव्हा आपण कामासाठी जगणे थांबवतो
आणि जगण्याचे काम सुरू करतो..


Retirement ही एक अशी वेळ असते,
जेव्हा आपण Without Job आयुष्य जगू शकतो..
ही निवृत्ती नसून जगण्याची एक नवी आवृत्ती आहे..


आपल्या आत्तापर्यंतच्या Dedication आणि Hard Work साठी,
तुम्ही Deserve करता ही निवृत्ती..
तुमची साथ आणि तुमची उणीव नेहमी आम्हाला भासत राहील..


सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात.
वाईट वाटून घेऊ नका आठवणी आपल्या सदैव ताज्या राहणार आहेत..
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!


आला आनंदाचा क्षण,
आता तुम्ही जगू शकाल आयुष्यातील प्रत्येक उरलेला क्षण,
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!


तुम्ही होता तेव्हा सगळे प्रश्न सहज सुटत होते..
काम सगळे पटपट होत होते.
पण आता तुम्ही सेवानिवृत्त होताय दु:ख तर खूप होतेय..
पण तुम्ही आनंदी राहाल या आनंदाने मन खुशही होतेय..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!


सेवानिवृत्तीचा दिवस आला..
अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला..
जे जे तुम्ही ठरवलं ते ते सगळं करावं..
तुम्हाला जे जे हवं ते ते सारं मिळावं..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!


सोडून चाललात ऑफिस तरी मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही..
खात्री आहे आम्हाला दिवसातून एक फोन केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही..!


आयुष्यातील तुमच्या नव्या प्रवासासाठी तुम्हाला माझ्याकडून मन:पुर्वक शुभेच्छा!


आता नको घड्याळ आणि नको कामाचा ताण..
सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य जगा एकदम छान..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!


तुमच्या अनुभवातून खूप मोठा झालो.
तुमच्यामुळे आयुष्यात बरचं काही करु शकलो.
यापुढे नसू एकत्र जरी तरी मनात असाल कायम.
सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा!


त्या ऑफिसमधील गप्पा,
तुमचा ओरडा सगळेच आता पुन्हा होणार नाही.
तुमच्यासारखा बॉस मला पुन्हा मिळणार नाही..
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!


लाभो सारे सुख आपणास,
सहज व्हावी पुढची वाटचाल,
काही चुकले असेल या पामराकडून,
तर मोठ्या मनाने करावे मला माफ..
सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा!


बस, ट्रेनचे धक्के खात केला तुम्ही प्रवास..
आता रिटायरमेंट म्हणतेय घरीच बसून करा मस्त आराम…
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!


आई-वडिलांच्या पुण्याईने आज आपण आयुष्यात चांगले दिवस पाहिले.
दादा पुन्हा एकदा एकत्र जगण्याचे दिवस आपले आले..
सेवानिवृत्ती लखलाभो!


तुमच्या वयाची साठी कधी आली आम्हाला कळले नाही..
आयुष्याच्या सेंकड इनिंगचा सदुपयोग करा..
मस्त फिरा आणि स्वस्थ राहा..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!


साठी असते दुसरे बालपण..
स्वत:ला लहान समजून पुन्हा एकदा नव्याने जगण्याचे म्हातारपण ..
सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा!


आज तुमचा सेवानिवृत्ती दिवस !
उद्यापासून तुम्ही आमच्यासोबत असणार नाही याची आज प्रकर्षाने जाणीव होत आहे..
आता कोणी देईल आम्हाला मार्गदर्शन याचा सतत विचार मनाशी येत आहे.
प्रत्येक क्षण तुम्हाला आम्ही मिस करु..
तुमच्या आयुष्याची नवी वाटचाल सुखद आणि आरोग्याची जावो ही शुभेच्छा!


आज तुम्ही सेवानिवृत्त होताय विश्वास होत नाही.
तुमच्या आयुष्याची नवी वाटचाल सुखद आणि आरोग्याची जावो ही शुभेच्छा!


उद्या तुमची ऑफिसमधील जागा कोणी दुसरं घेईल..
पण आमच्या मनातील तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही..
सेवा निवृत्तीच्या आनंददायी शुभेच्छा!


तुमच्या Retirement चा अर्थ असा होतो कि,
तुमच्या जीवनातील Best Role साठी,
तुम्हाला Promotion मिळालं आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *