Shradhanjali Message in Marathi

असा जन्म लाभावा
देहाचा चंदन व्हावा ।
गंध संपला तरी
सुगंध दरवळत राहावा ।
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐


तुझे जाणे मला
कायमचे दु:ख देऊन गेले…
आता तुझ्या आठवणींचाच
मला आधार आहे…
💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐


मृत्यू एकमेव सत्य आहे आणि
शरीर नश्वर आहे. हे माहित असूनही
आपल्या जवळच्या व्यक्तीच्या
जाण्यामुळे दुःख होते.
देवाला प्रार्थना आहे की
त्यांना मोक्ष प्रदान करा.
💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐

 


आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली,
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज
ही श्रद्धांजली
आत्म्यास चिरशांती लाभो हीच
ईश्वरचरणी प्रार्थना.
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐


जशी वेळ निघून जाईल
तशी जखम सुद्धा भरून येईल,
पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना
कुठलीच तोड नाही, त्यांच्या आठवणींचे झरे
इतके की साखरही गोड नाही.
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐


अश्रृंचे बांध फुटूनी,
हृदय येते भरुनी
जाल इतक्या लवकर निघूनी,
नव्हते स्वप्नीले कधी कुणी !
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐


हे विधात्या पुरे पुरे रे,
दुष्ट खेळ हा सारा !
आकाशातून पुन्हा निखळला,
एक हासरा तारा !!
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐


अश्रू लपवण्याच्या नादात मी
मलाच दोष देत राहिले
आणि या खोट्या प्रयत्नात
मी तुला आणखीच आठवत राहिले.
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻


हे देवा तू मला इतकं का रडवलंस,
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या
व्यक्तिला माझ्यापासून दूर का नेलंस.
आई बाबांचा होता तू लाडका,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा,
एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा.
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻


तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले…
आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे…
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐


आयुष्यात इतक्या लवकर
आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते.
नियतीने घात केला.
तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला.
शरीराने तू गेलास तरी मनाने
माझ्यासोबत राहशील ही अपेक्षा
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐


आज रडू माझे आवरत नाही..
तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही..
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐


मृत्यू टाळता आले असते तर
फार बरे झाले असते….
आज तुला श्रद्धांजली देण्याची
वेळ आली नसती.


तुमच्या आत्म्यास शांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🏻


तुमच्या आयुष्यातील
हा कठीण प्रसंग आहे.
देवाकडे इतकीच प्रार्थना की
देव तुम्हाला त्यातून शक्ती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏🏻


🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना !


तो हसरा चेहरा,
नाही कोणाला दुःखवले,
मनाचा तो भोळेपणा,
कधी नाही केला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐


कष्टाने संसार थाटला पण
राहिली नाही साथ आम्हाला,
आठवण येते प्रत्येक क्षणाला,
आजही तुमची वाट पाहतो,
यावे पुन्हा जन्माला.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐


आपल्या वडिलांना
देवाज्ञा झाली ऐकून दुःख झाले,
तो एक देवमाणुस होता.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.


आई बाबांचा लाडका तु,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
परत येरे माझ्या सोन्या,
तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐


सगळे म्हणतात कि,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही
आणि ती थांबतहि नाही,
पण हे कोणालाच कसे समजत नाही,
की लाख मित्र असले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.


जड अंतःकरणाने,
मी त्या पवित्र आत्म्यास
चिरंतन शांतता मिळवी
यासाठी प्रार्थना करतो.”


काही गोष्टी बोलायच्या राहून गेल्या…
आता त्याचे दु:ख होतेय…
तू लवकर सोडून गेलास
याचे दु:ख मनाला छळते आहे..
भावपूर्ण श्रद्धांजली


जीवन हे क्षणभंगुर आहे.
हे तुझ्या जाण्यानंतर मला कळले.
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.


जे झाले ते खूप वाईट झाले
यावर विश्वासच बसत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
आणि त्यांच्या परिवाराला
या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो.


जाणारे आपल्यानंतर एक अशी
पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो..


पुन्हा हातात हात घेऊन
तुझ्यासोबत चालता येणार नाही…
पण मला माहीत आहे तू कायम
माझ्या सोबत असणार आहेस…


आयुष्यातील सगळ्याच गोष्टी
आपल्या हाती नसतात.
मृत्यूही नाही तू सोडून गेलास
हे दु:ख सहन होत नाही…
भावपूर्ण श्रद्धांजली


शून्यामधूनी विश्व् निर्मूनी,
कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,
लोभ, माया, प्रीती देवूनी,
सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर जाहला तुम्ही जीवनी…


काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…
भावपूर्ण श्रद्धांजली


ज्यांच्यावर आपण अपार प्रेम करतो,
त्यांच्या ह्रदयात आपण कधीच मरत नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली!


तू गेल्याची बातमी ऐकून
आजही हळहळते मन….
वाटे खोटे असावे हे सगळे तरी क्षणभर…
भावपूर्ण आदरांजली


अश्रू लपवण्याच्या नादात
मी मलाच दोष देत राहिले
आणि या खोट्या प्रयत्नात
मी तुला आणखीच आठवत राहिले.
भावपूर्ण श्रद्धांजली


आता सहवास नसला तरी
स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली|

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.