तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
बाबा.. वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
या वयातही
तुमच्यातला उत्साह
आणि चैतन्य
पाहिलं की वाटतं,
आयुष्यभर इतकं कष्ट घेऊनही
तुमच्यातला हा उत्साह
अजून कसा टिकून आहे..
खरंच बाबा,
मी नेहमीच तुमच्या
पावलावर पाऊल टाकून,
आयुष्य जगायचा प्रयत्न करेन..
हॅपी बर्थ डे बाबा..!