वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Vadhdivas Shubhechha

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी – प्रत्येक प्रेमळ नात्यासाठी

प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास असा दिवस असतो. ज्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहतात तो दिवस म्हणजे ‘वाढदिवस’. नवीन जबाबदारी अंगावर येणार याची जाणीव करून देणारा हा दिवस असतो. तरीही वाढदिवस म्हटले कि बर्थडे साठी सुंदर असा पोशाख, नवीन हेअर स्टाईल, फिरायला जाण्याचे ठिकाण, आवडता सिनेमा, आवडीचे जेवण असा बेत हा आधीच मनात ठरलेला असतो, आणि हे सर्व करतांना त्या प्रत्येक क्षणांची दृश्ये आपल्या मोबाइल मध्ये त्या सुंदर दिवसाची आठवण म्हणून आपल्याला कैद करायची असतात . काहीही म्हणा वाढदिवस साजरा करणे हि संकल्पना मात्र अफलातून आहे. आता आधुनिकीकरणामुळे शुभेच्छा देणे खूप सोपे झाले आहे. फेसबुक च्या कृपने परिचितांचे वाढदिवस सहज लक्षात राहतात पण दहा ते पंधरा वर्षापूर्वी हे चित्र थोडं वेगळं होतं. नातेवाईक किंव्हा मित्र मैत्रिणीचे वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी डायरी किंव्हा भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडर यांचाच सहारा घेतला जायचा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चारोळया आठवणीने वहीत लिहून ठेवलेल्या असायच्या. पण हल्ली मात्र मराठीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं किती सोपं झालं आहे ना! गूगल मध्ये मराठी बर्थडे एस. एम. एस (Marathi Birthday Status) टाईप केले की, तुम्हाला पाहिजे तसे त्या अर्थाचे हजारो मराठी बर्थडे Status क्षणात मिळतात.

Read more