Death Anniversary Quotes In Marathi

प्रेम देऊनी जगाला जवळ केले सर्वांना,
न उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला,
कल्पनेतही नव्हते तुमचे जाणे, अधुरे राहिले जीवन गाणे,
आता फक्त एकच उरले तुमच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहणे,
तुमच्या स्मृतींना आमची भावपूर्ण आदरांजली.


पवित्र स्मृतींची ज्योत तेवते,
अखंड आमच्या मनी,
सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी
आठवुनी अस्तित्व, दिव्य, तव वृत्ती भारावली
कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली.


क्षणो क्षणी आता आमच्या मनी
तुमचीच आठवण येत आहे,
हृदयात साठवलेल्या आठवणींना आता
अश्रुद्वारे वाट मोकळी होत आहे.

 


तुमच असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं
ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते
आज सर्व काही असण्याची जाणीव आहे
पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे..


सुरु आहे वाटचाल तुमच्या आशीर्वादाने
जीवन पथावर चालत राहू तुमच्या आदर्श संयमाने
सदैव जपतो आम्ही तुमच्या आदर्श व स्मृतीला
आपल्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली..


एक दिवस असा आला,
अचानक तुम्ही निरोप घेऊन गेलात,
सर्व काही ओळखीच्या वाटेवर
केवळ स्मृती ठेवून गेलात..


आपल्या तत्वांशी एकनिष्ठ होतात तुम्ही,
अथक प्रयत्नांनी माणसं घडवली तुम्ही
सर्वांच्या ह्रदयावर राज्य केले तुम्ही
माणुसकीचा आधारस्तंभ होतात तुम्ही
म्हणूनच देवाला सुद्धा आवडलात तुम्ही..


एकही दिवस जात नाही तुझी आठवण येत नाही,
कितीही वर्ष झाली तरी तुझ्या आठवणी काही जात नाही
गेलास तू सोडून झाले होते आम्हाला दु:ख …
आठवण तुझी आली दाटून …
आज सकाळीच तू पुन्हा आलीस स्वप्नात …
घराचे दरवाजे आजही उघडे आहेत..


अजूनही होतो भास
तुम्ही आहात जवळपास
शांती लाभो तुमच्या आत्म्यास
हीच प्रार्थना परमेश्वरास
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..


तू सोबत नसलास तरी
तुझ्या आठवणी सोबत राहतील,
भावपूर्ण श्रद्धांजली..


गेलेली व्यक्ती परत येत नाही
पण त्या व्यक्तिची आठवण कायम आपल्यासोबत राहते..


तू होतास माझा जवळचा,
आता नसला तरीही कायम राहशील,
मा्झ्या आठवणीच्या कोपऱ्यात कायम तू राहशील.

Shradhanjali Message in Marathi

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा । गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा । 💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐 तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले… आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे… 💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐 मृत्यू एकमेव सत्य आहे आणि शरीर नश्वर आहे. हे माहित असूनही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामुळे दुःख होते. देवाला प्रार्थना आहे की त्यांना … Read more

RIP Messages In Marathi

देव मृत आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबास हा आघात सहन करण्याची ताकद देवो.. जो गेला त्याचा आत्मा अमर झाला… देव त्या मृतात्म्यास शांती देवो… जग सोडून जाणे आपल्या हातात नाही.. पण त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या आत्मशांतीसाठी मात्र आपण प्रार्थना करु शकतो.. अत्यंत दुर्देवी असा दिवस… देव हे सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना देवो.. नि:शब्द… भावपूर्ण … Read more

Condolence Messages in Marathi

“या दु:खाच्या काळात, तुम्हाला शांती आणि उपचार मिळोत. या कठीण काळातून जाण्यासाठी तुम्हाला प्रेम आणि शक्ती पाठवत आहे.” तुम्हाला गमावल्यामुळे मी किती दुःखी झालो आहे, हे शब्द व्यक्त करू शकत नाही. कृपया माझी मनापासून सहानुभूती स्वीकारा.” “तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आठवणींमध्ये तुम्हाला शक्ती आणि सांत्वन मिळो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना माझ्या मनःपूर्वक संवेदना.” तुमच्या नुकसानाबद्दल मला … Read more