Womens Day Quotes in Marathi

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू…
जागतिक महिला दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!


स्मरण त्यागाचे स्मरण शौर्याचे स्मरण ध्यासाचे स्मरण स्त्री पर्वाचे..!
जागतिक महिला दिन निमित्त स्त्री शक्तीला मानाचा मुजरा..!


तुच सावित्री तुच जिजाई.. तुच अहिल्या, तुच रमाई..!
जागतिक महिला दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!


८ वे आश्चर्य नसूनही ती बदलते जगाचं गणित..
स्री शक्तीला दिल से सलाम..
जागतिक महिला दिन निमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा..!


एका स्त्री ची जबरदस्त इच्छाशक्ती
जगातल्या ५-५ महाकाय साम्राज्य उध्वस्त करू शकते,
हे राजमाता आई जिजाऊंनी अख्ख्या जगाला दाखवले.
जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा..!


ती आहे म्हणून सारे विश्व आहे,
ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
आणि केवळ ती आहे,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे..
Happy Women’s Day!


ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे,
तीच सुरुवात आहे आणि
सुरुवात नसेल तर
बाकी सारं व्यर्थ आहे..
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


आज जागतिक महिला दिनानिमित्त
तमाम माझ्या बहिणींना, युवतींना, किशोरींना,
विविध पातळीवर यशाची
उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,
शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या
कष्ट करणाऱ्या बहिणींनाही आभाळभर शुभेच्छा…
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊंचा ‘शिवबा’ झाला..
ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला..
ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला..
आणि ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो सीतेचा ‘राम’ झाला..
“प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिहाचा वाटा आहे…”
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.