पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझा माझा सहवास हा सात जन्मीचा आहे,
हे आता मला खरं वाटायला लागलं आहे..
मी न बोलताच तुला सगळं समजतं,
तू सगळ्याच ठिकाणी माझी बाजू सांभाळते,
याचे मला नेहमीच कौतुक वाटते..
तू आहेस म्हणून घराचा डोलारा दिमाखात उभा आहे,
तुझ्या कामाचा मला नेहमीच हेवा आहे..
तू इतकी कसं काय सांभाळते?
तुझ्याशी केलेल्या भांडणात निराळीच मज्जा असते,
चूक तुझी असली तरी माफी मलाच मागायची असते..
तुझ्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ आहे,
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आहे !!
Patnila Vadhdivsachya Shubhechha Marathi
आईला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे.
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.
तू माझ्या आयुष्याला वळण दिले
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले.
किती गाऊ आई तुझी थोरवी
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही..
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे मागणे आहे..
आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
Aai La Vadhdivsanimitta Shubhechha
मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्यासाठी माझे आयुष्य पणाला लावीन,
तू शिकवलेली शिकवण नेहमीच लक्षात ठेवीन..
आई-बाबा नंतर तूच माझं पहिलं दैवत,
कठीण प्रसंगी कोणत्याही तू लगेच येतो धावत..
तूच माझा सखा, तूच सच्चा दोस्त,
तुझ्यासारखा भाऊ मिळायला खूप नशीब लागतं..
तुला जे जे हवे ते ते मिळो हीच देवाकडे इच्छा,
दादा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
Birthday Wishes Big Brother in Marathi
मराठी मधील वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि वाढदिवस स्टेटस
वाढदिवस हा नेहमी वाढदिवस असलेल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी खूप विशेष असतो आणि तेवढाच त्याच्या किंवा तिच्या प्रियजनांसाठी महत्वाचा असतो. हा विशेष दिवस वर्षातून एकदाच येत असल्याने त्यांना तो भव्यतेने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करणे खूप आवडते. वाढदिवसाला बर्थडे बॉय किव्हा बर्थडे गर्ल बद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना वाढदिवसाचे स्टेटस आणि शुभेच्छापत्र पाठविणे सर्वांनाच आवडते.
काही वेळा असे होते कि आपणास शूभेच्छा देण्यासाठी शब्द सुचत नाहीत किव्हा आपल्या भावना त्यांच्यापर्यंत कोणत्या शब्दात पोहचवाव्या हे सुचत नाही, तुम्हीदेखील अश्या स्थितीमध्ये असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
जोपर्यंत हिंदी मराठी स्टेटस वेबसाईट इंटरनेटवर उपलब्ध आहे तोपर्यंत मराठी आणि हिंदी भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. आपल्या पूर्ण उत्साहाने वाढदिवसाच्या वाढदिवस असलेल्या मित्रांची किव्हा मैत्रिणीची प्रशंसा करा. आपल्या भावनांना सशक्त शब्दांत चाल देऊन आपल्या मित्र, कुटुंबातील सदस्यांना आणि परिचितांना अत्यंत हृदयपूर्ण आणि प्रेमळ मार्गाने आनंदमय अश्या मराठी शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा.
आपल्या भावना अत्यंत प्रेमळपणे व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे अपडेटेड हिंदी आणि मराठी स्टेटसचा खजिना आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याच भाषेत (मराठी) पाठवून त्यांना आनंदित करा. बर्थडे बॉय किव्हा गर्ल ला सांगा की हा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे आणि आपल्याला या खास दिवसात खरोखर आनंद झाला आहे. आमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मराठीतील चारोळ्या आणि संदेश विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, ट्विटर, पिंटरेस्ट आणि इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप) वर आपण शेयर करू शकता. आपल्याला त्यासाठी एक पैसेही देण्याची आवश्यकता नाही. हे पूर्णपणे विनामूल्य आहे.